ताज्या बातम्या

Lokshahi Marathwada Sanwad 2025 | Ambadas Danve | "ज्या पक्षाचे जे व्हायचं ते होईल त्याची चिंता करण्याची गरज नाही पण ..."

'लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकशाही मराठीचा एक गौरवशाली लोकशाही मराठवाडा संवाद २०२५ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.

Published by : Siddhi Naringrekar

'लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकशाही मराठीचा एक गौरवशाली लोकशाही मराठवाडा संवाद २०२५ (Lokshahi Marathwada Sanwad 2025 ) या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमातून मराठवाड्याच्या भूमीतून आलेल्या दिग्गजांचा सत्कार केला गेला. तसेच मराठवाड्याच्या भविष्यासाठी राजकीय नेत्यांचं व्हिजन काय आहे? मराठवाड्याच्या विकासाचा रोडमॅप कसा आहे, हे जाणून घेतलं.

या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve ) यांच्यासोबत संवाद साधण्यात आला. यावेळी अंबादास दानवे यांनी म्हटले आहे की, "पक्ष, विचार हा एक स्वतंत्र विचार आहे. कारण विकास हा पक्षाच्या आधारावर होत नाही. मराठवाड्यात आताच्या घडीला सगळ्यात महत्वाचा विषय आहे सिंचनाचा. मराठावाड्याचे जे पाणी आहे मग ते गोदावरी खोऱ्याचे असो किंवा कृष्णा खोऱ्याचे असेल या सगळ्या विषयात मागच्या काळापासून मराठवाडा वॉटर ग्रीन नावाच्या योजनेची घोषणा सरकारने केलेली आहे. मराठवाड्याला जायकवाडीमध्ये जे हक्काचं पाणी आहे. मराठवाड्याला जायकवाडीला जे पाणी येते हे पाणी नाशिक नगर जिल्ह्यातून येते. या पाण्यावर सगळ्यांचा समान अधिकार असतो. परंतु या मागच्या काळामध्ये या मराठवाड्यात येणारे पाणी या ना त्या कारणामुळे अडथळे आणले जातात.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, "ज्या ज्या पक्षाचे जे व्हायचं ते होईल त्याची चिंता करण्याची गरज नाही. त्याला जो तो समर्थ आहे. पण सगळ्यात आधी मराठवाड्याच्यादृष्टीने पाणी विषय महत्वाचा आहे. आगामी काळात आम्हाला याच्यावरच लढावं लागणार आहे. येणाऱ्या काळात पाण्यावरच लढाई होणार आहे. जायकवाडी प्रकल्प आशियातील सर्वात मोठा प्रकल्प. आम्ही वैचारिक एकमेकांच्याविरोधात आहोत पण आम्ही काही एकमेकांचे दुश्मन नाही. संवाद आहे विसंवाद नाही." असे अंबादास दानवे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते