Aaditya Thackeray
Aaditya Thackeray Team Lokshahi
राजकारण

"मला हवं तितकं चिडवा, पण..." आदित्य ठाकरेंची आक्रमक पत्रकार परिषद

Published by : Vikrant Shinde

वेदांता फॉक्सकॉननंतर आता टाटा एअरबसचा प्रकल्पही राज्यातून निघून गुजरातमध्ये गेल्यानंतर आज आदित्य ठाकरे यांनी सुभाष देसाई यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. या प्रकरणावरून विरोधक आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. या पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

  • महाराष्ट्रात घडामोडी वाढत चालल्या आहेत

  • मी दानवे साहेब, सचिन अहिर आम्ही सर्वांनी नाशिक पुणे दौरा केला, शेतकऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे

  • आम्ही अधिवेशनात पायऱ्यांवर आंदोलन करून ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली. मात्र सरकारने ऐकलं नाही

  • अजूनही शेतात पाणी आहे; कुठलाही मंत्री शेतात गेलेला नाही

  • आताच्या घडीला शेतकऱ्यांसोबत उभं राहायला हवं

  • एकीकडे शेतीचं नुकसान होत आहे. तर, दुसरीकडे उद्योग जगतात चौथा मोठा प्रकल्प बाहेर गेला

  • वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प अपल्याकडेच येणार होता; घटनाबाह्य मुख्यमंत्री यांनी सभागृहात सांगितलं होतं की वेदांता येणार आहे

  • दुसरा प्रकल्प बल्क ड्रग पार्क

  • त्यानंतर तिसरा मेडिकल इक्विपमेंट पार्क हा प्रकल्प गेला

  • तेव्हा आम्ही सांगत होतो की एअरबस प्रकल्प तरी आपल्या राज्यात येईल यासाठी प्रयत्न करा

  • एका माणसाच्या राक्षशी महत्वकांक्षामुळे गद्दारी मुळे महाराष्ट्राच नुकसान होते महाराष्ट्राला फटका बसतोय

  • मी जर यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असतो तर राजीनामा दिला असता आणि सरकारमधून बाहेर पडलो असतो आणि निवडणुकीला सामोरे गेलो असतो

"येणाऱ्या नव्या प्रकल्पाचं स्वागत"- सुभाष देसाई

"जर राज्यात नवा, मोठा प्रकल्प येणार असेल तर स्वागतच आहे. परंतु, तो प्रकल्प नेमका कोणता? याबाबत सरकारने भुमिका स्पष्ट करावी" असं मत सुभाष देसाई यांनी व्यक्त केलंय.

Cards: पत्ते खेळण्याने होतात 'हे' आरोग्यदायी फायदे

CSK vs RCB : सामन्यात पावसाने खोडा घातल्यास बंगळुरुच्या अडचणी वाढणार? काय आहे समीकरण? जाणून घ्या

"२० तारखेला निवडणूक होऊद्या, २१ तारखेला मिटिंग लावतो आणि..."; नाशिकच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

Carrom: कॅरम खेळल्याने होतात हे शारीरिक फायदे! जाणून घ्या...

Chess: बुद्धिबळ खेळण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या...