aditya thackeray
aditya thackeray Team Lokshahi
राजकारण

MLC Election 2022 : आदित्य ठाकरे मध्यरात्री आमदारांच्या भेटीला, घेतली बैठक

Published by : Team Lokshahi

MLC Election 2022 : विधान परिषद निवडणुकीमध्ये कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. आपले आमदार पवईच्या वेस्टीन हॉटेल मध्ये ठेवले आहेत. रात्री आमदारांना या हॉटेलमध्ये आणण्यात आलं. दोन दिवस या आमदारांचा मुक्काम याच हॉटेलमध्ये असणार आहे. दरम्यान रात्री उशिरा आदित्य ठाकरे (aditya-thackeray) हे वेस्टीन हॉटेलमध्ये आमदारांच्या भेटीसाठी दाखल झाले. हॉटेलमध्ये आमदारांची व्यवस्था कशा प्रकारे केली आहे, याचा आढावा देखील त्यांनी यावेळी घेतला. तसेच त्यांच्याशी संवाद देखील साधण्यात आला.

मंत्री अदित्य ठाकरे हे रात्री साडे बारा वाजता दाखल झाले. यावेळी अदित्य ठाकरे यांनी हॉटेलच्या कॉफी शॉपमध्ये कॉफी घेत बैठक घेतली. या बैठकीत परिवहन मंत्री अनिल परब, खासदार अनिल देसाई, कृषीमंत्री दादा भुसे उपस्थित होते. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि इतर काही विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. तासभर चर्चा झाल्यानंतर अदित्य ठाकरे हॉटेलमध्येच मुक्कामाला थांबले. राज्यसभा निवडणुकीत झालेली क्रॉस व्होटिंग पाहता खबरदारी म्हणून शिवसेनेने आमदारांना मतदानाच्या तीन दिवस आधीच हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला.

आमदारांना प्रशिक्षण

बैठकीनंतर शिवसेना नेते अनिल देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "पक्षाच्या सर्व आमदारांना 20 जून रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणूक आणि त्यासाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेदरम्यान कोणती काळजी घ्यावी, याचे प्रशिक्षण दिले. सर्व अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षाच्या आमदारांचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. यामुळे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजय होणार आहे.

Shantigiri Maharaj : शांतीगिरी महाराज यांनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले...

राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्यातील मतदान

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल