राजकारण

हिंमत असेल तर 40 गद्दारांच्या मतदारसंघात निवडणुका घ्या; आदित्य ठाकरेंचे आव्हान

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई: भाजपच्या बालेकिल्ल्यात नागपूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले विजयी झाले आहेत. कोकणातून भाजप समर्थित उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. तर, बहुचर्चित नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आघाडीवर आहेत. यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणुकीत हार-जीत असते. पण, हिंमत असेल तर विधानसभा निवडणुका, पालिका निवडणुका घ्या. लवकरात लवकर निवडणूक लावावी. आता मुख्य गोष्ट ही आहे की हिंमत असेल तर निवडणुकीला सामोरे यावं. 40 गद्दारांच्या मतदारसंघात निवडणुका घ्या, असे आव्हान आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले आहे.

आपल्या राज्यात, देशात आणि आपले मुंबईमध्ये लोकशाही आहे की नाही हा विचार आता मनात येईल. कारण जसं एक आपण बघताय की महापालिकेत असे हुकूमशाहीचं वातावरण आहे. या राज्यात देखील तसेच सुरू आहे. महत्वाची गोष्ट हीच राहते की आपले मुंबईमध्ये जी जगभरात तुम्ही ओळखली जाते. मुंबई म्हणून आपण सगळे मुंबईकर म्हणून ओळखले जातो. त्या मुंबईची ओळख आता अशी होत चालले की इथे एक वर्ष महानगरपालिकेत कोणाची सत्ता नसताना प्रशासक आणि जे काही प्रशासन आहे ते अंदाधुंद कारभार चालवत आहे आणि मुंबईकरांचा पैसा याचा चुराडा करत आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, आजचा निकाल म्हणजे सत्ताधारी पक्षाला चपराक आहे. पदवीधर आणि शिक्षक हा दोन्ही वर्ग आमच्या पाठीशी आहेत. नागपूर सारखी जागा देखील अडचणीत आलेली आहे. कोकणचे उमेदवार जरी जिंकले असतील तरी ते शिवसेनेचेच होते. कोकणचे जिंकलेली उमेदवार उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे होते. सत्यजित तांबे हे काँग्रेस पक्षाचे युवकांचे अध्यक्ष होते. तांब्यांचे अख्ख घराणं काँग्रेसचच आहे. सत्यजित तांबेच निवडून येतील, असे अजित पवार यांनी म्हंटले आहे.

फडणवीसांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना धाराशिवमध्ये धरलं धारेवर; म्हणाले, "मोदींच्या ट्रेनमध्येच..."

T20 World Cup Selection : धावांचा पाऊस पाडणाऱ्या के एल राहुलचा पत्ता कट? भारतीय संघात 'या' दिग्गज खेळाडूंची केली निवड

"...म्हणून नरेंद्र मोदींच्या अंगात औरंगजेब संचारलाय"; संजय राऊतांनी सासवडमध्ये महायुतीवर डागली तोफ

Wedding Rituals: हिंदू धर्मात लग्नाच्या वेळेस का केली जाते सप्तपदी? जाणून घ्या कारण...

Wedding Rituals: लग्नात का चोरतात नवरदेवाचे बूट? रंजक आहे यामागचं कारण