Amay Khopar
Amay Khopar Team Lokshahi
राजकारण

सत्तार, कदमांच्या पाठोपाठ आता मनसेच्या नेत्याचाही टीका करताना तोल गेला

Published by : Sagar Pradhan

हर हर महादेव हा मराठी चित्रपट सध्या वादाच्या भवऱ्यात आला आहे. माजी खासदार संभाजीराजे यांनी हर हर महादेव चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर आता त्यानंतर राज्यातील सर्व मराठा संघटनांकडून या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होऊ लागली आहे. ही मागणी होत असतानाच काल गदारोळादरम्यान जितेंद्र आव्हाडांनी थेट ठाण्यातील एका चित्रपट गृहात घुसून चित्रपटाचा शो बंद पाडला. मात्र, मनसेने या चित्रपटाला समर्थन दर्शवले. परंतु त्यानंतर या चित्रपटावरुन मनसे आणि राष्ट्रवादी संघर्ष बघायला मिळात आहे.

मनसेकडून जितेंद्र आव्हाड यांच्या शो बंद पडण्याच्या कृत्याला आव्हान देण्यासाठी आज संध्याकाळी त्याच चित्रपटगृहात हर हर महादेव चित्रपटाचा शो ठेवण्यात आला होता. यावेळी अमेय खोपकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर खालच्या पातळीची टीका केली. ते म्हणाले की, राष्ट्रवादी फक्त जातीपातीचे राजकारण करत आहे. हे सगळं निवडणुकीना ठेवून चाललं आहे. तुम्ही आमच्या एका मराठी प्रेक्षकाला त्याच्या परिवारासमोर तुम्ही दहा-पंधरा जण मारतात? राष्ट्रवादीवाले गांxxची औलाद आहेत. या लोकांना लाजा नाही वाटतं?, असे खळबळजनक विधान खोपकर यांनी केले आहे.

पुढे ते म्हणाले की, “अमोल मिटकरींना ध्यानात ठेवायचं. त्यांनी काल मला चॅलेंज केलं होतं ना? त्यांचं चॅलेंज स्वीकारलंय. हर हर महादेव चित्रपट पाहण्यासाठी आज ठाण्यात आलोय आणि हा चित्रपट पाहतोय. उगाच जातीपातीचं राजकारण करायचं. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न आहे”, असं अमेय खोपकर म्हणाले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे घेणार राज ठाकरे यांची भेट

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; 15 जणांचा मृत्यू

मुंबईतील स्थानिक अधिकाऱ्यांना अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आदेश

घाटकोपरमध्ये बचावकार्यादरम्यान होर्डिंगचा लोखंडी सांगडा उचलताना पेट्रोल पंपाला आग

Bhavesh Bhide : अनधिकृत होर्डींग लावणारे भावेश भिंडे ठाकरेंच्या जवळचे असल्याचा आरोप