राजकारण

मुख्यमंत्र्यांची ही फालतुगिरी; अजित पवारांचा हल्लाबोल,...म्हणजे आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत

Published by : Shweta Shigvan-Kavankar

प्रशांत जगताप | सातारा : राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर आहेत. याआधी एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आताच्या ताज्या प्रश्नांना डायव्हर्ट करण्याची मुख्यमंत्र्यांची ही फालतुगिरी आहे. आमच्यावर निशाणा साधला म्हणजे आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत, अशी जोरदार टीका अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

अजित पवार हे सातारा जिल्हा दौऱ्यावर असून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांची त्यांनी बैठक घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी कोणी ट्विटरवरुन आमच्यावर निशाणा साधला म्हणजे आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत. प्रत्येकाच्या ट्विटला उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही. असे तर रोज हौसे, नौसे, गौसे ट्विट करत राहणार त्यांना उत्तर देण्यास आम्ही बांधील नाही, अशा शब्दात त्यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

प्रत्येकाला तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्याचा अधिकार आहे. तसेच, मुख्यमंत्री हे अयोध्येला रामाच्या दर्शनासाठी गेले आहेत. मात्र, आम्ही कधी इकडे जाणार तिकडे जाणार हे सांगत नाही. जातीचा, धर्माचा वापर माणसांमध्ये फूट पाडण्यात द्वेष पसरवण्यात कोणी करू नये एवढीच अपेक्षा आमची आहे असे सांगत एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावर भाष्य केलं.

मी वक्तव्य केल्याने यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावर सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत न पाणी पिता आत्मक्लेश केलं हे कुठल्या जाहीर भाषणांमध्ये मी वक्तव्य केलं नव्हतं. मी केलेले वक्तव्यात चूकच होतं. मात्र, घोंगडी बैठकीमध्ये तशा पद्धतीच वाक्य जायला नको होतं त्याबाबत मी आत्मक्लेष केला आहे. तेच तेच काढून बेरोजगारी आणि महागाई कमी होणार आहे का? असा सवाल अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे. आत्ताच्या ताज्या प्रश्नांना डायव्हर्ट करण्याची मुख्यमंत्र्यांची ही फालतुगिरी असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर शरद पवार यांनीही शरसंधान साधला. आपण बघतोय सर्व मंत्रीमंडळ, आमदार, खासदार अयोध्येत गेले. सध्या महागाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आहे. आज धर्म आणि जात यावर वाद सुरू आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालं. हे सगळं सोडून सगळ्यांना घेऊन अयोध्येला जायचं, यात प्राधान्य कशाला द्यायचं, हे ठरवा, असा निशाणा शरद पवारांनी शिंदे-फडणवीसांवर साधला आहे. आमची श्रद्धा शेतकऱ्यांशी निगडित आहे. प्रत्येकाची श्रद्धा वेगळी असते. प्रश्न सोडवू शकत नाही, ते लोक अशी भूमिका घेतात, असाही टोला त्यांनी लगावला आहे.

IPL 2024 : चेन्नई आणि लखनऊ संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर, प्ले ऑफचं स्वप्न भंगलं?

टी-२० वर्ल्डकपआधी भारताच्या अडचणी वाढल्या, कर्णधार रोहित शर्माला दुखापत, 'या' खेळाडूनं दिली मोठी अपडेट

"४ जूनला आमचं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणार"; रत्नागिरी-चिपळूणमध्ये आदित्य ठाकरेंनी पेटवली 'मशाल'

सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Yamini Jadhav : प्रचाराला कमी दिवस असले तरी आम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या दृष्टीकोनातून लोकांपर्यंत पोहचलेलो आहोत