राजकारण

राष्ट्रवादी हा काय पक्षयं का? त्यांच्याकडे विचार आहेत का; बावनकुळेंकडून प्रत्युत्तर

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांच्या टीकेचा समाचार भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. अजित पवार अस्वस्थ आहेत. सत्ता गेल्याचे दुःख चेहऱ्यावर दिसत आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रवादी हा काय पक्ष आहे का? त्यांच्याकडे विचार आहे का? पक्षाचे व्हिजन काय आहे? फक्त आपले कारखाने उघडा आणि भ्रष्टाचार करा. त्यांच्या एकमेकांतच फायटिंग सुरु झाली आहे. अजित पवार यांनी म्हणणे ऐकले असते तर पाच वर्ष सत्तेत असते. शरद पवार यांचे ऐकले म्हणून अडीच वर्षात सत्ता गेली. आता त्यांच्याच पक्षात सरकार गेल्यापासून नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सत्तेपासून वेगळे राहण्याची त्यांच्या पक्षाला सवय नाही, अशी टीका त्यांनी केला आहे.

किती जणांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे याची माहिती मागवली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, मविआ काळात गरज नसलेल्या शेकडो लोकांना त्यांनी सुरक्षा दिली. फडणवीस यांची सुरक्षा कमी केली, ते आकसाने वागले. गार्ड काढून घेतले, गाड्या कमी केल्या. त्यामुळे त्यांनी सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलू नये. फडणवीस संवेदनशील गृहमंत्री आहेत. तुमच्या काळात तात्काळ कारवाई झाली नाही. परंतु, राज्यात ३ महिन्यात झालेल्या घटनांवर तात्काळ कारवाई केली आहे. याबाबत सरकारचे अभिनंदन करायला हवे. ९९ टक्के प्रकरणात गुन्हा घडल्यावर २४ तासांत आरोपींना पकडले. ज्या प्रकारे चार्जशीट फाईल होत आहे, त्यात आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, असेदेखील त्यांनी म्हंटले आहे.

तसेच, अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून प्रशासन ठप्प असल्याचा आरोपही केला होता. यावरुन ज्या सरकारमध्ये बैठक होत नव्हत्या. कॅबिनेट बैठक व्हर्च्युअल होत होत्या. त्यांनी हा प्रश्न विचारू नये. अडीच वर्षात जे निर्णय घेतले नाही, ते तीन महिन्यात शिंदे फडणवीस सरकारने घेतले आहेत, असे बावनकुळेंनी पवारांना सुनावले. माहिती अधिकारानुसार जे प्रकल्प आता गेले ते मुख्यमंत्री मंत्रालयात नसल्याने गेले आहेत. यासाठी उद्योगपती व अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी लागते. मुख्यमंत्र्यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीला भेटण्यासाठी ४ तास ताटकळत उभे राहावे लागायचे. आमदाराच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी सही केली का? उद्योजकांसह करार केले. मात्र, त्यावर कारवाई केली नाही. पण, शिंदे व फडणवीस हे उद्योगपतींसह बैठक घेत चर्चा करत आहेत. राज्याला हवे असलेले ते नेते आहेत, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, शिंदे गट लवकरच गुवाहाटीला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यावरुन शिंदे गटावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, देवीच्या दर्शनासाठी जात असतील तर यांच्या पोटात का दुखते. २०० पेक्षा अधिक जागांचा आई कामाख्या आशीर्वाद देईल, अशी भीती त्यांना वाटत असावी, असा मिश्कील टोलोही त्यांनी लगावला आहे.

Amol Kolhe : कांदा निर्यात बंदी जी उठवली ही फसवी निर्यात बंदी उठवली आहे

सुषमा अंधारे यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाल्या...

"भाजप सरकारच्या नादानपणामुळे भारतीय सैनिकांवर हल्ला झाला"; 'मशाल' पेटवून उद्धव ठाकरेंचं PM मोदींवर शरसंधान

IPL 2024 : धरमशाला मैदानात चेन्नई बनला सुपर 'किंग'! पंजाबचा केला दारुण पराभव

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल