राजकारण

कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निवृत्तीबाबत शरद पवारांचा मोठा निर्णय; अजित पवारांनी सांगितला

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. परंतु, हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही. यामुळे शरद पवारांनी निर्णय मागे घेण्याचे मागणी करत आहेत. यासाठी कार्यकर्त्यांनी उपोषण सुरु केले आहे. अशातच, अजित पवार यांनी शरद पवारांची सिल्व्हर ओकवर घेतली आहे. दोन ते तीन दिवसात आपल्या निर्णयावर विचार करणार आहेत, असे शरद पवार म्हणाल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे.

अजित पवार, छगन भुजबळ, रोहित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी शरद पवारांची सिल्व्हर ओकवर भेट घेतली. यावेळी तुमच्या सर्वांच्या आग्रहाखातर दोन-तीन दिवस द्या, असे शरद पवारांनी म्हंटले आहे. आपण साहेबांना दैवत मानतो. दैवत म्हणतयं 2-3 दिवस पाहिजे. मात्र, ते विचार तेव्हाच करणार येथील सर्व कार्यकर्ते आपआपल्या घरी निघून जायचं. मला हट्टीपणा करताना एकही कार्यकर्ता दिसला नाही पाहिजे. सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या घरी जाऊन आपले जेवण खाऊन पिऊन घरी राहावे. तुम्ही जर येथे बसलेला दिसला तर मी माझा निर्णय बदलणार नाही, असे शरद पवारांनी सांगितल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.

त्याचबरोबर राज्यातील उस्मानाबाद, बुलाढाणा जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. हे राजीनामा सत्र ताबडतोब थांबवायला पाहिजे. शरद पवारांनी असेही सांगितलंयं, सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकांऱ्यांसह कोणीही राजीनामा द्यायचं कारण नाही, असे आवाहन त्यांनी केले आहे. माझ्या म्हणण्याला प्रतिसाद दिला पाहिजे. माझ्यावर सर्व जण अवलंबून असतील तर त्यांनी माझ ऐकलंच पाहिजे. माझी, सुप्रियाताई आणि भुजबळ साहेब, रोहित यांची विनंती आहे की तुम्ही हट्टीपणा सोडून प्रत्येकाने आपपलं घरी जायला पाहिजे. त्यांनाही देशातून, राज्यातून फोन येतं आहेत, असे अजित पवारांनी सांगितले.

शरद पवारांनी गांभीर्यांने या गोष्टी घेतल्या आहेत. त्यांनी जीवाभावच्या कार्यकर्त्यांना निरोप पाठवला आहे. जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी घरच्या वडीलधाऱ्यांचे ऐकायंचं असते. आपल्या महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. यामुळे आपल्या साहेबांना त्रास होईल. त्यांनी हट्टीपणा सोडाला नाही तर तुम्ही माझेच कार्यकर्ते मी डबल हट्टी मी निर्णय बदलणार नाही, असेही शरद पवार म्हणाल्याचे अजित पवारांनी सांगितले.

Abhijeet Patil: अभिजीत पाटील यांना दिलासा, विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई मागे

2017मध्ये राष्ट्रवादीचं काय ठरलं होतं? सुनिल तटकरे यांनी लोकशाहीला थेट सांगितलं

निवडणुकीदरम्यान 'डीप फेक' रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

Rajendra Gavit : पालघर लोकसभेची उमेदवारी मला नाकारली गेली,त्यामुळे माझ्या दृष्टीने एक दु:खद घटना असं म्हणायला हरकत नाही

अमिताभ बच्चन यांच्या ट्विटवरून शिवसेना UBT-भाजप ट्विटर वॉर