राजकारण

Ajit Pawar : वंदे भारत ट्रेनमध्ये दादांची क्रेझ

Published by : Siddhi Naringrekar

मुंबई - नाशिक येथे आयोजित 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार वंदे भारत ट्रेनने सकाळी नाशिककडे रवाना झाले. नेहमी प्रमाणे वृत्तपत्रे वाचत अजित पवार यांचा प्रवास सुरु झाला. मात्र या प्रवासात सहप्रवासी असलेले एक ज्येष्ठ नागरिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी येऊन बसले. "दादा तुम्ही कामाचे लोक, आम्हाला बाकी कशाशी घेणे-देणे नाही. अजितदादा म्हणजे कामाचा माणूस, आम्ही जनरल पब्लिक तुमच्याबद्दल आदर...अशीच जनतेची कामे करा, बेस्ट लक दादा"... अशा शब्दात त्यांनी जणू राज्यातल्या जानेतेचीच प्रतिनिधीक भावना व्यक्त केली. .

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा जे शक्य आहे, लोक हिताचे आहे ते करत राहणार, काही सूचना असतील तर करा असे सांगत आपल्या सोबत असणाऱ्या विशेष कार्य अधिकाऱ्यांना त्यांची नोंद घेण्यास सांगितले. प्रवासात इतर प्रवाशांना त्रास होऊ नये, कोणाला अडवू नका अशा सूचना आपल्या सुरक्षा रक्षकांना केल्या. अशा प्रकारे वंदे भारत ट्रेनने अजितदादांची क्रेझ अनुभवली

शिरूर मतदारसंघाच्या ईव्हीएम स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही 24 तास बंद

Shambhuraj Desai : 4 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा चांगल्या मताधिक्याने माननीय नरेश म्हस्के साहेब निवडून येतील

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा

मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

World Hypertension Day 2024 : 'जागतिक उच्च रक्तदाब दिवस' कधी आणि का साजरा केला जातो?