राजकारण

अजित पवारांनी वाटप केलेल्या वाहनांची चौकशी करावी; अंबादास दानवेंची मागणी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : देशात लवकरच लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. याचदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व जिल्हाध्यक्षांना नव्या कोऱ्या चारचाकी गाडी देणार असल्याची घोषणा केली होती. यावरुन ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

अंबादास दानवे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जिल्हाध्यक्षांना वाटप केलेल्या गाड्या कुठून आल्या याचा हिशोब समोर यायला हवा. अजित पवार यांनी वाटप केलेल्या वाहनांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासह राम मंदिराच्या आमंत्रणावरून आम्ही निमंत्रण मोहताज नाही, असेही दानवे म्हणाले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला आपल्या जिल्ह्यात पक्षाचा प्रचार करण्यासाठी आणि फिरण्यासाठी पक्षाकडून चारचाकी वाहनं दिलं जाणार आहे. याबाबतची घोषणा अजित पवार यांनी केली होती. तब्बल 40 हून अधिक गाड्या अजित पवार गटाकडून विकत घेण्यात येत आहेत. या गाड्या स्टेट ड्राईव्हसाठी पक्षाच्या कार्यालयात दाखल झाल्या आहेत.

ठाण्याच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले; " ज्यांनी बाळासाहेबांना अटक..."

IPL 2024, CSK vs RR : चेन्नई सुपर किंग्जच्या प्ले ऑफच्या आशा पल्लवीत; राजस्थानचा ५ विकेट्सने केला पराभव

Daily Horoscope 13 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या आयुष्यात होतील सकारात्मक बदल; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 13 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"...तर तुम्हाला गुलामगिरीत राहावं लागेल"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंचा PM मोदींवर निशाणा