राजकारण

शरद पवार हे गद्दारीचे आदिपुरुष, आज त्यांचा वाढदिवस साजरा करा; कोणी केली टीका?

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सूरज दहाट | अमरावती : शिंदे-फडणवीस सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर खोक्यांची प्रतिकृती उभारली आहे. राष्ट्रवादीकडून पन्नास खोके एकदम ओके म्हणत आज गद्दार दिन साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देत भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार हे गद्दारीचे आदिपुरुष म्हणून आज त्यांचा वाढदिवस साजरा करा, अशी टीका त्यांनी केली आहे.

शिवसेनेतून हिंदुत्वाचा विचार घेऊन चाळीस आमदारांनी उठाव केला. ते गद्दार नाहीतर स्वाभिमानी आहेत. मात्र, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गद्दार दिन साजरा करत आहे. त्यांनी आज गद्दार दिनाऐवजी शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करावा. कारण महाराष्ट्रात तोडफोडीचा राजकारण करून पहिल्यांदा कुणी सरकार स्थापन केलं असेल तर ते राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आहेत.

त्यामुळे तुळसोळीच्या राजकारणाचे शरद पवार हे आदिपुरुष आहेत. त्यामुळे कोण गद्दार आहे त्याचा विचार करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज केक कापून पवार साहेबांचा वाढदिवस साजरा करा, अशी खोचक टीका अनिल बोंडे यांनी केले.

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...

India Alliance Meeting : बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तिप्रदर्शन, मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार सभा

Anil Deshmukh : तटकरे साहेब हॉटेलमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना भेटले; आमच्या संपर्कात जरी ते आले तरी आम्ही त्यांना घेणार नाही

Kejriwal Meet Thackeray : इंडिया आघाडीच्या सभेआधी केजरीवाल घेणार ठाकरेंची भेट