राजकारण

ऋतुजाताईंचे अभिनंदन, भाजपाच्या मदतीमुळे अंधेरी पूर्वमध्ये विजय; शेलारांच्या खोचक शुभेच्छा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : सत्तांतरानंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला आहे. यामध्ये शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. यामुळे शिवसेनेची विजयी मशाल पेटली असून राज्यभरात शिवसैनिकांकडून जल्लोष सुरु आहे. यावर भाजपकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

भाजप नेते आशिष शेलार म्हणाले की, भाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्व मध्ये विजय. ऋतुजाताईंचे अभिनंदन. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाकप डझनभर पक्षांनी पाठिंबा देऊन ही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला ना मतदान जास्त झाले, ना मतं जास्त मिळाली. भाजपाने निवडणूक लढवली असती तर यांचा पराभव निश्चित होता, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत पहिल्या फेरीपासून ऋतुजा लटकेंनी आघाडी घेतली आहे. यामुळे लटकेंचा विजय जवळपास निश्चित मानण्यात येत होता. मतमोजणीअखेर ऋतुजा लटकेंनी एकूण ६६ हजार २४७ मतं मिळवली. नोटाला १२ हजार ७७८ मतं मिळाली आणि १ हजार ५६९ मतांसह राजेश त्रिपाठी तिसऱ्या स्थानावर राहिले.

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा

मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

World Hypertension Day 2024 : 'जागतिक उच्च रक्तदाब दिवस' कधी आणि का साजरा केला जातो?

"४ तारखेनंतर टरबूजचा भाव उतरणार आहे"; उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका

Daily Horoscope 17 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना साडेसातीचाही होणार त्रास; पाहा तुमचे भविष्य