राजकारण

Ashish Shelar : हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने काय काय करुन दाखवलं...?

Published by : Siddhi Naringrekar

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. आशिष शेलार यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेलार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने काय काय करुन दाखवलं...?

◆शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो सांगितले आणि स्वतःच मुख्यमंत्री होऊन दाखवलं! ◆श्रीमती सोनिया गांधी, शरद पवार यांच्या सोबत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावून दाखवले ! ◆राम मंदिरावर टीका करुन दाखवली ! ◆हिंदू सणांवर बंदी आणून दाखवली ! ◆छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागून दाखवले ◆छत्रपतींच्या वाघ नखांबाबत प्रश्न चिन्ह निर्माण करुन दाखवले! ◆वंदनीय बाळासाहेबांनी आयुष्यभर ठाकरी फटकारे मारले त्या काँग्रेस, राष्ट्रवादी, लालू प्रसाद, स्टॅलिन पासून आता समाजवाद्यांसोबत सुपुत्राने जाऊन दाखवलं !

"गर्व से कहो हम हिंदू हैं" म्हणणारी शिवसेना आता.. "गर्व से कहों हम समाजवादी हैं" म्हणू लागली..! भविष्यात कदाचित "गर्व से कहो हम MIM हैं" सुध्दा म्हणू लागतील!! असे म्हणत शेलार यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा

मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

World Hypertension Day 2024 : 'जागतिक उच्च रक्तदाब दिवस' कधी आणि का साजरा केला जातो?

"४ तारखेनंतर टरबूजचा भाव उतरणार आहे"; उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका

Daily Horoscope 17 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना साडेसातीचाही होणार त्रास; पाहा तुमचे भविष्य