राजकारण

औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्याच्या प्रस्तावाला विधानसभेत मंजुरी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर करण्याच्या ठरावाला विधानसभेत आज मंजुरी देण्यात आली आहे. औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव नामांतराचा ठराव मांडण्यात आला होता. याशिवाय नवी मुंबई विमानतळाला दी. बा. पाटील यांचं नाव देण्यालाही मंजुरी मिळाली आहे.

औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दि बा पाटील असं नामांतर करण्यात आले. नामांतराचा कायदा मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शहराच्या नावासाठी 'ही' प्रक्रिया

भारतीय संविधानातील सातव्या परिशिष्ठामधील राज्यसुचीमध्ये जमीन हा विषय राज्याच्या यादीत दिला आहे. त्यामुळे जमिनीला जोडून असणारे सर्व अधिकार हे राज्याकडे येतात. राज्य ते आपल्या महसुली अधिकारांतर्गत त्याचा वापर करते.

राज्याला जरी अधिकार असले तरी केंद्राने १९५३ साली एक मार्गदर्शक तत्व जारी करुन एक मर्यादा घातली आहे. या मार्गदर्शक तत्वामध्ये एखाद्या शहराचं किंवा गावाचं नाव बदलण्यासाठी काय करावे याची एक सविस्तर प्रक्रिया ठरवून दिली आहे.

राज्यांने प्रस्ताव संमत करावा. हा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवावा लागतो. राज्य सरकारने ठराव मंजूर करुन पाठवला तर केंद्र सरकार हे गृहित धरत की ‘राज्य सरकारने सर्व लोकमताचा विचार विनीमय घेवून, इतर संबंधित संस्थांची परवानगी घेवून (नगरपालिका, महानगरपालिका) हा प्रस्ताव पाठवला आहे.

केंद्र सरकार नाव बदलण्याशी संबंधित केंद्रातील सर्व संस्थांशी (उदा: सर्वेअर जनरल ऑफ इंडिया) चर्चा केल्यानंतर हा प्रस्ताव योग्य आहे किंवा नाही याची शहानिशा केली जाते.

गृहमंत्रालयाने ‘ना हरकत’ प्रमाणपत्र जारी केलं तर आणि तरचं राज्य सरकारला नाव बदलता येत.

Daily Horoscope 07 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 07 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

ICSE 2024 Results: आयसीएसई बोर्डाचा १०वी, १२वीचा निकाल जाहीर; यंदा मुलींनी मारली बाजी!

Rohit Pawar: रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...

Rice Water: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या...