राजकारण

Election Commission : निवडणुकांचे बिगुल वाजले; पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

Published by : Siddhi Naringrekar

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाची विधानसभा निवडणुकीचा तारखा आज समोर आल्या. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत तारखा जाहीर केल्या आहेत.  17 ऑक्टोबरला मतदान यादी प्रसिद्ध होणार असून, 23 ऑक्टोबरपर्यंत मतदान यादी सुधारण्याची संधी मतदारांना असणार आहे.  

मध्यप्रदेश, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणामध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहे तर तर छत्तीसगडमधील निवडणुक ही दोन टप्प्यात होणार आहे. मध्य प्रदेशमध्ये 7 नोव्हेंबरला, राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला, छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबरला, तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला आणि मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. 3 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.

  • मिझोरम - 7 नोव्हेंबर रोजी मतदान

  • छत्तीसगड - 7  आणि 17 नोव्हेंबर रोजी मतदान

  • मध्यप्रदेश - 17 नोव्हेंबर रोजी मतदान

  • राजस्थान - 23 नोव्हेंबर रोजी  मतदान

  • तेलंगणा -  30 नोव्हेंबर रोजी मतदान

  • पाच राज्यांचा निकाल - 3 डिसेंबर रोजी

पाच राज्यात 679 जागांवर मतदान होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना व्होट फ्रॉम होम करता येणार आहे. लवकरच या पाच राज्यात आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे. आदिवासी भागात PVTG मतदान केंद्राची सोय करण्यात आल्याची माहिती आहे.

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल