Amit Shah | Satyapal Malik
Amit Shah | Satyapal Malik Team Lokshahi
राजकारण

मलिकांच्या आरोपांवर अमित शाहांची पलटवार; म्हणाले, जनतेने आणि...

Published by : Sagar Pradhan

राज्यासह देशाच्या राजकारणात सध्या प्रचंड गदारोळ पाहायला मिळत आहे. हे सर्व सुरू असताना काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ‘द वायर’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती आणि पुलवामा हल्ल्याबाबत मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होता. त्यांच्या या आरोपांनंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र, यावरच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाष्य केले आहे.

काय म्हणाले अमित शाह मलिकांच्या आरोपांवर?

इंडिया टुडेच्या कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले की, 'मलिकांना राज्यपाल पदावरून पायउतार झाल्यानंतरच या गोष्टी का आठवत आहेत? त्यांनी केलेले आरोप जर खरे असतील तर राज्यपाल पदावर असताना ते या विषयावर का बोलले नाहीत? याचा विचार आता जनतेने आणि माध्यमांनी करावा. खरं तर लोक जेव्हा सत्तेत असतात तेव्हा अनेकदा त्यांचा विवेक जागा होत नाही' अशी बाजू त्यांनी यावेळी मांडली.

काय केले होते मलिकांनी आरोप?

‘द वायर’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सत्यपाल मलिक म्हणाले होते की, पुलवामा हल्ला जेव्हा झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गप्प राहायला सांगितले. गृहमंत्रालयाच्या चुकीमुळे 40 जवानांना जीव गमवावा लागला. अजित डोवाल यांनीही याबाबत मला गप्प राहण्यास सांगत या हल्ल्याचा आरोप पाकिस्तानकडे जाईल आणि याचा फायदा निवडणुकीत होईल. असं त्यांनी सांगितले असल्याचे मलिक म्हणाले होते.

Sanjay Raut : फक्त आमची सभा होऊ नये म्हणून प्रधानमंत्र्यांना बोलवण्यात आलं

Sanjay Raut : प्रधानमंत्री मुंबईत येऊन 25 - 30 सभा घेतात, मग तुम्ही 10 वर्ष काहीच काम केलं नाही ना

पंतप्रधान मोदी यांच्या सभेत घोषणा देणाऱ्या तरुणाने घेतली शरद पवार यांची भेट

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र; म्हणाले...

शिरूर मतदारसंघाच्या ईव्हीएम स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही 24 तास बंद