Chandrashekhar Bawankule | Uddhav Thackeray | Prakash Ambedkar
Chandrashekhar Bawankule | Uddhav Thackeray | Prakash Ambedkar Team Lokshahi
राजकारण

'उद्धव ठाकरे धृतराष्ट्रसारखे अंध' वंचित-शिवसेना युतीवर बावनकुळेंचे टीकास्त्र

Published by : Sagar Pradhan

भूपेश बारंगे वर्धा: जिल्ह्यात शिक्षक मतदार संघाच्या प्रचारार्थ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आले असता त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे इतके खाली गेले आहेत की ज्या हिंदुत्वाचा प्रखर विरोध प्रकाश आंबेडकर यांनी केला,त्यांच्याशी युती करावी लागत आहे. काही दिवसात ते ओवेसी युती करतील अशी स्थिती निर्माण झाली आहे. उध्दव ठाकरे इतके खाली गेले आहेत की ज्या हिंदुत्वाचा प्रखर विरोध प्रकाश आंबेडकर यांनी केला, त्यांच्याशी युती करावी लागत आहे. काही दिवसात ते ओवैसीशी युती करतील, अशी स्थिती निर्माण झाली आहे. असे बावनकुळे यावेळी म्हणाले.

विनाशबुद्धे विपरीत काल आहे. जे काही उरले सुरले शिवसैनिक आहे तेसुद्धा उद्धव ठाकरेंचा त्याग करतील आणि अडीच वर्षापासून उध्दव ठाकरे यांनी हिंदुत्वाला तिलांजली दिली आहे कधी शरद पवार साहबांचे विचार मान्य केलें कधी काँग्रेसचे विचार मान्य केले.. स्वातंत्र्यविर सावरकर यांचा घोर अपमान करणारी काँग्रेस पार्टी त्यांनी मान्य केली.. आता प्रकाश आंबेडकर यांची प्रखर हिंदूविरोधी भूमिका त्यांनी मान्य केली.. पण आम्ही मजबूत आहोत.. ५१ टक्के लढाययची आमची तयारी आहे.. कितीही पक्ष एक झाले तरी भाजप आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी आणि एकनाथजी यांच्या समनवयातून पुन्हा एकदा प्रचंड ताकदीने शत प्रतिषत मतदान मिळवू आणि प्रचंड ताकदीने येणाऱ्या निवडणुकीत पुढे राहू.

कोणी काय अपेक्षा व्यक्त करायच्या हा त्यांच पक्षाच काम आहे. आज मात्र हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. वरून बघत असतील तर त्यांना आज मोठ दुःख झालं असेल.. उद्धव ठाकरे यांनी कधी अस पाऊल उचलतील की त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विरोध केला, एक टोक बाळासाहेब आणि एक टोक प्रकश आंबेडकर इतका टोकाचा विरोध हिंदूत्वबद्दल विचाराबद्दल केल. आणि ज्या व्यक्तीमध्ये इतका स्वार्थ आला असेल. म्हणजे राजकारणाकरीता, खुर्चीकरीता इतका स्वार्थी व्यक्ती कि विचारांशी कॉम्परमाईज करन,ज्या विचारधारेवर शिवसेना स्थापन झाली ती विचारधारा त्या ठिकाणीं तोडल्या गेली.खड्डयात टाकण्यात आली. अशा व्यक्तीचा हा स्वार्थी राजकारणी म्हणून इतिहासात नोंद होईल

उध्दव ठाकरे स्वार्थी राजकारणी;धृतराष्ट्रसारखे ते अंध

एककिडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये स्वतःच पद मिळवण्याकरिता स्वतः मुख्यमंत्री होण्याकरिता वाटेल ते केलं.आताही ते खुर्चीवर बसण्याकरिता वाटेल त्या कंपरमाईझ उद्धव ठाकरे करतात.ज्या जे शिवसेना हिंदुत्ववासाठी स्थापन झाली आहे ते त्यांना कळत नाही आहे.ते सध्या धृतराष्ट्र सारखे अंध झाले आहे.

Rajendra Gavit : पालघर लोकसभेची उमेदवारी मला नाकारली गेली,त्यामुळे माझ्या दृष्टीने एक दु:खद घटना असं म्हणायला हरकत नाही

अमिताभ बच्चन यांच्या ट्विटवरून शिवसेना UBT-भाजप ट्विटर वॉर

निवडणुकीच्या दिवशी मेट्रो प्रवाशांना तिकिटावर मिळणार १० टक्के सवलत

Ravindra Waikar: उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार रविंद्र वायकर आज अर्ज दाखल करणार, म्हणाले...

Eknath Shinde on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंकडून मलाही मुख्यमंत्री पदाची ऑफर