राजकारण

भाजप खासदार जयसिध्देश्वर स्वामी अडचणीत; पुन्हा सुरू होणार 'ही' डोकेदुखी

Published by : Team Lokshahi

वसीम अत्तर | सोलापुर : लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रावर पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाची ऑर्डर सोलापूर पडताळणी समितीला मिळाली आहे. २८ जुलैला समितीचे सदस्य खासदारांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या फेर पडताळणीची कार्यवाही सुरु करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत खासदारांनी बनावट जात प्रमाणपत्र जोडल्याची तक्रार प्रमोद गायकवाड यांनी जात पडताळणी समितीकडे केली होती. त्यानंतर समितीने दक्षता पथक नेमून खासदारांच्या मूळ गावापासून प्रमाणपत्र दिलेल्या तहसील कार्यालयापर्यंतची सर्व कागदपत्रे पडताळून पाहिली.

सुनावणीअंती प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल समितीने दिला होता. त्यानंतर जिल्हा न्यायालयाच्या निकालानुसार अक्कलकोट तहसीलदारांच्या माध्यमातून खासदार डॉ. महास्वामींविरूद्ध कलम ४२० अंतर्गत गुन्हा देखील दाखल झाला. त्यावर डॉ. महास्वामींनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

काही दिवसांपूर्वी त्यावर उच्च न्यायालयाने निकाल देत या जात पडताळणी प्रकरणी फेर तपासणी करून समितीने निकाल द्यावा, असे आदेश दिले. त्यानुसार आता जात पडताळणी समितीचे कामकाज सुरु झाले आहे. त्यामुळे आता खासदारांना पुन्हा त्यासंदर्भातील सुनावणीला सामोरे जावे लागणार आहे.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...