Devendra Fadnavis | Sada Sarvankar
Devendra Fadnavis | Sada Sarvankar Team Lokshahi
राजकारण

शिवसेनेला मोठा धक्का! 'त्या' प्रकरणी आमदार सरवणकरांवर गुन्हा दाखल; फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती

Published by : Sagar Pradhan

शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडण्यास सुरुवात झाली. त्यातच दुसरीकडे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात देखील वाद उफाळून बाहेर येऊ लागला. तर काही महिन्यांपूर्वी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आले होते. त्यावेळी आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणी पोलिसांचा तपासात सरवणकर यांनी तो गोळीबार केला नव्हता, अशी माहिती समोर आली होती. याच संदर्भात आता सरवणकरांचा शस्त्र परवाना रद्द होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“राज्यात लोकप्रतिनिधी आणि खासगी व्यक्तींकडून झालेला गोळीबार हा विषय आपण मांडला होता. ज्यामध्ये आपण सदा सरवणकर यांचा विषय मांडला होता. या नमूद गुन्ह्यामध्ये 14 साक्षीदार तपासले. या प्रकरणात सदा सरवणकर, त्यांचा मुलगा समाधान सरवणकर असे एकूण 11 आरोपींवर कलम 41 अ अन्वये नोटीस देण्यात आली”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पुढे ते म्हणाले की, “त्याचप्रमाणे त्यांचं जे लायसन्सधारी पिस्तूल आहे ते त्यांनी स्वत: सोबत बाळगणं आवश्यक असताना त्यांनी ते गाडीत ठेवलं. असं ते ठेवता येत नाही. त्यामुळे आर्म्स अॅक्ट 1969 चे कलम 30 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी लायसन्स आणि शर्थी नियमांचं उल्लंघन केलं असल्याने त्यांना जो काही शस्त्र परवाना दिलाय तो रद्द करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे”, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

नेमकं काय आहे प्रकरण?

दादरच्या प्रभादेवी परिसरात काही महिन्यांपूर्वी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. त्यावेळी या वादात गोळीबार झाल्याची घटना घडली होती. तेव्हा हा गोळीबार आमदार सदा सरवणकर यांनी केल्याचा गंभीर आरोप करण्यात येत होता. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. पण आतापर्यंत पोलीस तपासातून एक गोष्ट समोर आलीय, ती म्हणजे त्यावेळी गोळीबार झाला होता. पण सदा सरवणकर यांनी तो गोळीबार केला नव्हता, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली.

Abhijeet Patil: अभिजीत पाटील यांना दिलासा, विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई मागे

2017मध्ये राष्ट्रवादीचं काय ठरलं होतं? सुनिल तटकरे यांनी लोकशाहीला थेट सांगितलं

निवडणुकीदरम्यान 'डीप फेक' रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

Rajendra Gavit : पालघर लोकसभेची उमेदवारी मला नाकारली गेली,त्यामुळे माझ्या दृष्टीने एक दु:खद घटना असं म्हणायला हरकत नाही

अमिताभ बच्चन यांच्या ट्विटवरून शिवसेना UBT-भाजप ट्विटर वॉर