राजकारण

महापालिकेची मालमत्ता भाजपाची खाजगी इस्टेट का? चंद्रकांत पाटलांची अग्निशामक दलाच्या गाडीवर सवारी, नेटकरी संतापले

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : नवनिर्वाचित मंत्री चंद्रकांत पाटील शपथविधीनंतर पहिल्यांदाच पुण्यात दाखल झाले होते. यावेळी त्यांचे जोरात स्वागत करण्यात आले. परंतु, यादरम्यान चंद्रकांत पाटील यांनी अग्निशामक दलाची गाडी वापरल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. यामुळे नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

चंद्रकांत पाटील पुण्यात दौऱ्यावर असताना दगडूशेठ गणपतीचे कोथरुडचे ग्रामदैवत श्री म्हातोबांचे दर्शन घेतले. यानंतर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यादरम्यान त्यांनी अग्निशामक दलाची गाडी वापरल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन आता नेटकऱ्यांनी चंद्रकांत पाटलांना चांगलेच धारेवर धरले आहे. यामुळे चंद्रकांत पाटलांचा पुणे दौरा वादात सापडला आहे.

महापालिकेची मालमत्ता भाजपाची खाजगी इस्टेट आहे का? अग्निशमनदलाची शिडी कोणत्या अधिकारात वापरली? असा वापर कायदेशीर आहे का? अग्निशमन दलाची यंत्रणा यासाठी आहे का? हा मुद्दा एका युजरने उपस्थित केला आहे.

तर, आणखी एका युजरने अवघड आहे सगळ. आता कुठे पालकमंत्री झाले आहे. पुढे जाऊन अजून काय काय बघाव लागतंय कुणास ठाऊक, अशी चिंता व्यक्त केली आहे. व 70 वर्ष उपाशी होते 8 वर्षात पोट भरून घेतले- केंद्र सरकार, अशी टीका दुसऱ्या युजरने केंद्र सरकारवर केली आहे.

अग्निशामकची गाडी कुठे मिळते व कसा अर्ज करावा. पूर्ण माहिती द्या लवकर दहीहंडी आहे. कुछ तुफानी करते है, असे म्हणत युजरने चंद्रकांत पाटलांना ट्रोल केले आहे.

दरम्यान, नवनिर्वाचित भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि नवनिर्वाचित भाजपा मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांना नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. नवीन जबाबदारीतून आपले कणखर आणि सक्षम नेतृत्व अधिक उजळून निघेल अशी मला खात्री आहे, अशा शुभेच्छा चंद्रकांत पाटलांनी दिल्या आहेत. तसेच, सर्वांनी घरावर झेंडा फडकावावा, असे आवाहनही केले आहे.

"...तर कांद्याची माळ घालून मोदींचं स्वागत करा"; नाशिकमध्ये PM मोदींच्या सभेपूर्वी आमदार रोहित पवारांचं ट्वीट चर्चेत

IPL 2024 : आता चेन्नई सुपर किंग्जसाठी खतरा! RCB ला 'प्ले ऑफ'मध्ये पोहचवणार '18'; जाणून घ्या या नंबरचं खास कनेक्शन

Kalyan Lok Sabha: मोदींच्या सभेत स्टेजवर स्थान नसल्याने मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरेंचा राजीनामा

Chicken Momos Recipe: घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीत बनवा चटपटीत चिकन मोमोज; जाणून घ्या रेसिपी...

T20 World Cup 2024 : सेमीफायनल सामन्यासाठी मोठी घोषणा, भारताने टॉप-४ मध्ये प्रवेश केल्यास 'या' ठिकाणी रंगणार सामना