राजकारण

लो कर लो बात, संपादक इतका अज्ञानी कसा; राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर चित्रा वाघ यांची टीका

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपा नेत्यांनी महापुरुषांविषयी केलेली वक्तव्ये तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून होणारी वक्तव्ये यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. परंतु, यामध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी चूक शोधली असून संपादक इतका अज्ञानी कसा राहू शकतो, अशी टीका केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

लोकशाहीमध्ये असे घडु नये. पण, असे घडतय. ज्या महाराष्ट्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. ज्याने लोकशाही जन्माला घातली. त्या महाराष्ट्रात जे घडतय. ते महाराष्ट्राचे दुर्देव आहे. महाराष्ट्रातील विषय फार गंभीर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासारख्या दैवतांचा जो अपमान घटनाकत्मक पदावर बसलेला व्यक्ती खुलेआम करतात आणि त्याचं समर्थन सरकार करत आहे. याविरोधात मोर्चा काढू नये का?, असा सवाल राऊतांना विचारला होता.

चित्रा वाघ यांची टीका

संजय राऊतांच्या वक्तव्यामध्ये चित्रा वाघ यांनी मोठी चूक काढली असून त्यांचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केली आहे. यासोबतच, लो कर लो बात, सर्वज्ञानी संजय राऊत जी म्हणताहेत "बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला" अहो, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे झाला आहे. तर हे असं आहे सर्वज्ञानी यांचं अगाध ज्ञान. संपादक इतका अज्ञानी कसा राहू शकतो? भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे झाला इतके सामान्य ज्ञान असू नये. महापुरूषांचा असा अपमान तुम्ही करायचा आणि स्वतःचं मोर्चे काढायचे मुर्ख समजू नका. महाराष्ट्र तुम्हाला पुरतां ओळखून आहे तुमचा जाहिर निषेध, असे टीकास्त्र वाघ यांनी संजय राऊतांवर सोडले आहे.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेली वक्तव्ये तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून होणारी वक्तव्यांचा सर्वच स्तरावरुन निषेध करण्यात येत आहे. याविरोधात महाविकास आघाडीतर्फे १७ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.

Rice Water: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या...

Naseem Khan: नसीम खान यांचा प्रचार समितीचा राजीनामा मागे

Beed: बीडमध्ये चंदन तस्करी; निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त

Eknath Shinde On Wadettiwar: वड्डेटीवाराचं डोकं फिरलं आहे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार टीका

Shantigiri Maharaj: नाशिक लोकसभेतून माघारीचा अखेरचा दिवस, शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम