राजकारण

मुख्यमंत्री आता डॉ.एकनाथ शिंदे; म्हणाले, मी छोटी-मोठी ऑपरेशन...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी.लीट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीकडून एकनाथ शिंदे यांना डी.लीट पदवी प्रदान करण्यात आली. सामाजिक, वैद्यकीय आणि आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल एकनाथ शिंदे त्यांना ही पदवी देण्यात आली. यावेळी राज्यपाल रमेश बैसही उपस्थित होते. मी आता डॉक्टर झालेलो नाही. तर याआधीही छोटी-मोठी ऑपरेशन केलेली आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.

मी आधीच डॉक्टर झालेलो आहे. छोटी-मोठी मी ऑपरेशन करत असतो. पण, मी या समाजामध्ये इतके वर्ष काम करत आहे. या कामाच्या माध्यमातून किंवा जगाच्या विद्यापीठाच्या माध्यमातून खूप काही शिकायला मिळाले, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. मी मुख्यमंत्री असलो तरी आजही कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. आरोप करणाऱ्यांना मी उत्तर देत नसतो. त्यांना कामातून मी उत्तर देतो.

विनम्रता माझ्यासाठी महत्वाचे आहे. प्रत्येक माणसाने आयुष्यात कितीही चढ-उतार आले तरी विनम्र असावे. मी ही डी.लीट पदवी महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करतो. जनतेने प्रेम दिल्यामुळे मी आज मुख्यमंत्री आहे. अनेक संकट आली मात्र मी घाबरलो नाही. त्याचा सामना करत इथपर्यंत पोहचलो आहे. श्रीमंतांच्या यादीत माझे नाव येणार नाही. मात्र, माणुसकीच्या यादीत माझे नाव नक्की येईल, असेही त्यांनी म्हंटले आहे.

ठाण्याच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले; " ज्यांनी बाळासाहेबांना अटक..."

IPL 2024, CSK vs RR : चेन्नई सुपर किंग्जच्या प्ले ऑफच्या आशा पल्लवीत; राजस्थानचा ५ विकेट्सने केला पराभव

Daily Horoscope 13 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या आयुष्यात होतील सकारात्मक बदल; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 13 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"...तर तुम्हाला गुलामगिरीत राहावं लागेल"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंचा PM मोदींवर निशाणा