Eknath Shinde Team Lokshahi
राजकारण

"येवढं मोठं परिवर्तन राज्यात कधी झालं नाही आणि होणारही नाही" मुख्यमंत्र्यांचं विधान

नंदुरबार दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी भाषण करताना अनेक मोठ्या निर्णयांचा उल्लेख केला.

Published by : Vikrant Shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नंदुरबार दौऱ्यावर आहेत. नंदुरबार दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी भाषण करताना अनेक मोठ्या निर्णयांचा उल्लेख केला. तर, त्यांनी पुन्हा एकदा 'हे जनतेचं सरकार असल्याचं म्हटलंय.

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

  • आम्ही शिवसेना वाचवण्याच्या भुमिकेतून पुढे आलोय

  • येवढं मोठं परिवर्तन राज्यात कधी झालं नाही आणि होणारही नाही

  • आम्ही अनेक ठिकाणी मेळावे, सभा घेतल्या सभांना उत्स्फुर्त गर्दी आहे

  • हे लोकांच्या मनातलं सरकार आहे

  • आम्ही सण-उत्सव पुन्हा सुरू केले

  • गेल्या अडीच वर्षांत अनेक विकासकामं थांबली होती

  • आम्ही पुन्हा प्रकल्प सुरू केले

  • आम्ही आतापर्यंत 72 मोठे निर्णय घेतलं.

  • NDRF च्या दुप्पट मदत आम्ही दिली

  • निकषांत न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत देण्याचा निर्णय घेतला

  • 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत एस टी प्रवास दिला

दरम्यान, या भाषणात मुख्यमंत्र्यांनी जरी शेतकऱ्यांना केलेल्या मदतीचा उल्लेख केला असला तरी विरोधकांकडून ही मदत शेतकऱ्यांना अद्याप मिळालीच नसल्याचं म्हटलं जातंय

निवडणूक आयोगचा पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा, 'तुतारी'बाबत मोठा निर्णय

निवडणूक आयोगचा पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा, 'ट्रंम्पेट' चिन्हाचे मराठी भाषांतर 'ट्रंम्पेट'

'जरांगेंच्या डोक्यात आता राजकारणाचं वारं शिरलंय' प्रविण दरेकरांची जरांगेंवर टीका

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगात तक्रार; कारण काय?

Sada Sarvankar | अमित ठाकरेंनी अर्ज मागे घ्यावा, राज ठाकरे यांना भेटून विनंती करणार : सदा सरवणकर