Gulabrao PatilTeam Lokshahi
राजकारण
"55 मधले 40 आमदार फुटले म्हणजे तुमच्यात काहीतरी कमतरता आहे" गुलाबराव पाटलांचा घणाघात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यादरम्यान पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणापुर्वी भाषण केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यादरम्यान पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणापुर्वी भाषण केलं. त्यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर त्यांनी निशाणा साधला.
काय म्हणाले पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील?
आम्ही गद्दारी केली नाही
शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले
धर्मवीर आनंद दिघे व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सत्ता पालटली
आमच्यावर टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा
55 मधले 40 आमदार फुटले म्हणजे तुमच्यात काहीतरी कमतरता आहे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांमधील संघर्ष चांगलाच शिगेला गेला आहे. आता गुलाबराव पाटलांच्या या टीकेला उद्धव ठाकरेंच्या गटाकडून काय प्रत्युत्तर मिळतं हे पाहणं गरजेचं आहे.