राजकारण

सुषमा अंधारे माझ्यावर आरोप लावत असतील तर मी...; दादा भुसेंचा इशारा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ड्रग्जमाफिया ललित पाटीलसाठी दादा भुसेंनी ससून रुग्णालयाला फोन केला होता, असा गंभीर आरोप केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. यावर आता कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सुषमा अंधारे माझ्यावर आरोप लावत असतील तर मग मी पण कायदेशीर मदत घेईन, असा इशारा त्यांनी दिला आहे.

दादा भुसे म्हणाले की, माझ्यावर जे आरोप लावले आहेत ते बेछूट आहेत. माझं नाव कोणी घेतले, कोणीतरी मंत्री आहे नाशिकचे एवढंच बोललं जातंय. सुषमा अंधारे यांनी जर माझा फोन चेक करायचा असेल तर मी माझे तिन्ही फोन देऊ शकतो मला काही भीती नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

ललित पाटील हे नाव मी यापूर्वी कधी ऐकले नाही. तो पुण्यात अ‍ॅडमिट होता, तो पुण्यातून पळून गेला यात माझा काय संबंध, असा उलट सवाल भुसेंनी विरोधकांना केला आहे. याची सखोल चौकशी व्हावी ही माझी पण इच्छा आहे. जर तो पळून गेला असेल पोलीस शोधून काढतील. पण, जर सुषमा अंधारे माझ्यावर आरोप लावत असतील तर मग मी पण कायदेशीर मदत घेईन, असा इशारा त्यांनी दिला आहे.

काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे?

ड्रग्जमाफिया ललितला ससूनमध्ये अ‍ॅडमिट करण्यासाठी भुसेंनी फोन केला होता, त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासा. ललित पाटील ससूनमध्ये अ‍ॅडमिट असताना तिथूनच तो ड्रग्ज रॅकेट चालवायचा. ससून हॉस्पिटलच्या बाहेर ड्रग्ज सापडलं होतं. तसेच ससूनमध्ये राहण्यासाठी ललित पाटील वरिष्ठांना रोज ७० हजारांची लाच देत होता, असा गौप्यस्फोट सुषमा अंधारेंनी केला आहे.

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार