राजकारण

राऊतांच्या अडचणी वाढणार! शिंदे-फडणवीसांची हक्कभंग समितीची घोषणा; नितेश राणेंचा समावेश

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : विधीमंडळ हे चोरमंडळ म्हणणे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना चांगलेच भोवणार आहे. महाविकास आघाडी काळात बनवण्यात आलेली विशेष हक्कभंग समिती शिवसेना-भाजप सरकारकडून बरखास्त केली आहे. नव्या 15 जणांची हक्कभंग समिती घोषित करण्यात आली असून अध्यक्षपदी राहुल कुल यांची निवड करण्यात आली आहे. परंतु, यामध्ये ठाकरे गटाच्या एकाही नेत्याचा समावेश करण्यात आलेला नाही.

या समितीत सत्ताधारी पक्षाचे 13, तर विरोधी पक्षाचे 2 सदस्य समितीत आहेत. या समितीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समावेश केला आहे. राहुल कुल, अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम, नितेश राणे, अभिमन्यू पवार, संजय शिरसाठ, दिलीप मोहिते पाटील, सदा सरवणकर, माणिकराव कोकाटे, सुनिल भूसारा, नितीन राऊत, सुनिल केदार, विनय कोरे, आशिष जैस्वाल यांचा समावेश करण्यात आला आहे. तर, राहुल कुल यांना हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी निवडले आहे. यानंतर समितीकडून राऊतांना उद्याच कारणे दाखवा नोटीस बजावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर, राऊत यांना ४८ तासांत उत्तर द्यावे लागणार आहे.

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाने चहा पानावर पत्र देऊन बहिष्कार टाकला. यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांनी देशद्रोहयांसोबत चहापान करणे आपण टाळले, असे म्हंटले. यावरुन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग नोटीस आणली आहे. उद्या दोन्ही नोटीसवर उपसभापती निर्णय घेणार आहेत. दोन दिवसांत चौकशी करुन बुधवारी ८ मार्च रोजी पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे.

मारुतीला पानांचा हार अर्पण करण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या...

Nana Patole On PM Modi: नरेंद्र मोदींचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा नाना पटोले यांनी लावला घणाघाती आरोप

Daily Horoscope 08 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना मेहनतीचं आवक फळ मिळणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 08 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

Rupali Chakankar: EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल