राजकारण

मोठी बातमी! दापोलीतील साई रिसॉर्ट तोडकामावर स्थगिती; सोमय्या परतले माघारी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : दापोलीतील वादाच्या भोऱ्यात सापडलेलं साई रिसॉर्टवर आज तोडकामाची कारवाई होणार होती. यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या हे स्वतः दापोलीत पोहोचले होते. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने तोडकामावर स्थगिती असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे सोमय्या माघारी परतले आहेत.

मुरुड येथील साई रिसॉर्ट अनिल परब यांच्या मालकीच्या असून हे रिसॉर्ट बांधताना गैरमार्गाने आलेल्या पैशाचा वापर केला गेला होता. तसेच शासनाची दिशाभूल करून हे रिसॉर्ट बांधण्यात आले होते असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. यावर न्यायालयात सुनावणी सुरु आहे. अशातच स्थानिक वृत्तपत्रामध्ये तोडकामाविषयी जाहिरात चिपळूण बांधकाम विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली होती. यानंतर आज साई रिसॉर्ट पाडणार अशा बातम्या येत होत्या. यासाठी किरीट सोमय्या स्वतः दापोलीत गेले होते. मात्र, साई रिसॉर्ट प्रकरण अद्यापही न्यायप्रविष्ठ असल्याने तोडकामावर स्थगिती असल्याचे समोर आले आहे. तसेच, पुढील सुनावणीत तोडकामसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

तर, प्रशासनाने साई रिसॉर्ट पाडण्याचे कोणतेही आदेश मिळाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याशेजारील सी कौंच रिसॉर्ट पाडण्याचे आदेश आहेत, असेही प्रशासनाने सांगितले आहे. यामुळे किरीट सोमय्या सी कौंच रिसॉर्टसमोरील काही फरशा तोडून माघारी परतले आहेत.

काय आहे प्रकरण?

शिवसेना नेते अनिल परब यांच्या मालकीचे साई रिसॉर्ट असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच ते रिसॉर्ट पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आले असून त्याविरोधात कारवाईची मागणी सोमय्या यांनी केली होती. मागील महिन्यात पर्यावरण मंत्रालयाने रिसॉर्ट पाडण्यात का येऊ नये, अशी विचारणा करणारी ‘कारणे दाखवा’ नोटीस रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांना बजावली होती. या नोटिशीविरोधात कदम यांनी त उच्च न्यायालयात धाव घेतली. अनिल परब यांच्यासोबतच्या राजकीय वैरामुळे आपल्याला या कारवाईत अडकवले जात आहे, असा दावा त्यांनी याचिकेत केला होता. यानंतर कारवाई करताना रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांना पूर्वसूचना देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने केंद्रीय मंत्रालयाला दिले होते.

Rahul Gandhi : रायबरेलीतून राहुल गांधी यांना उमेदवारी जाहीर

मंधाना-शेफालीचा धमाका! टीम इंडियाची विजयी हॅट्ट्रिक; बांगलादेशचा धुव्वा उडवून T20 मालिका जिंकली

"धेर्यशील माने किंवा इतर उमेदवार महत्त्वाचे नाहीत, कारण...", हातकणंगलेत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Daily Horoscope 3 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष ३ मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना