राजकारण

अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

Published by : Siddhi Naringrekar

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मॉरिस याने स्वत:ला देखील गोळ्या झाडल्या. मॉरिसने आधी त्याच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर फेसबुक लाईव्ह केलं. त्यांनी समाजासाठी आम्ही एकत्र आल्याचं म्हटलं. अभिषेक घोसाळकर यांचं बोलणं संपवून उठत असताना त्यांच्यावर अचानक गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसनंही स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या.

यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया आली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काल घडलेली अभिषेक घोसाळकर घटना अतिशय दुःखद आहे. एका तरुण नेत्याचे असे निधन होणे गंभीर आहे. पण त्यांचा नेमका काय वाद झाला आणि असे कृत्य घडलं याची पोलीस चौकशी करत आहेत. कारणे वेगवेगळी आहेत. काही लोक राजकारण करत आहेत. या घटनेचे राजकारण योग्य नाही. या घटनेमुळे कायदा सुव्यवस्था बिघडली हे म्हणणे योग्य नाही.

बंदुकांना लायसन्स देणे योग्य आहे का? लायन्सन कोणी दिले. येत्या काळात बंदुकाचे लायसन्स द्यायचे का? याचा विचारही राज्य सरकार करत आहे. घोसाळकर आणि मॉरिस काही वर्षे एकत्र काम करत होते. आपापसातील वादातून हा प्रकार घडला आहे. एखाद्या गाडीखाली श्वान आला तरी, ते राजीनामा मागतील. पण या घटनेचे कुणी राजकारण करू नये. असे फडणवीस म्हणाले.

पुन्हा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील चित्रपटाची टीम राज्यभर दौऱ्यावर

Hair Growth: केस गळतीमुळे त्रस्त आहात? एकदा नक्की वापरून पाहा 'हे' जादुई तेल...

पंतप्रधान मोदी यांच्या सभेत झालेल्या गोंधळावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Mahayuti Sabha: आज महायुतीची जाहीरसभा! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर

Sanjay Raut : फक्त आमची सभा होऊ नये म्हणून प्रधानमंत्र्यांना बोलवण्यात आलं