राजकारण

Devendra Fadnavis: बळीराजा जलसिंचन योजनेअंतर्गत विदर्भाला, मोदींचे आभार - देवेंद्र फडणवीस

Published by : Dhanshree Shintre

Devendra Fadnavis Speech Yavatmal: आज आपल्या सर्वांकरता अत्यंत आनंदाचा दिवस आहे. ज्या यवतमाळमध्ये पूर्ण महाराष्ट्रातील एकमेव सीतामातेचं मंदिर आहे. त्याच यवतमाळमध्ये नारी शक्ती वंदनेचा कार्यक्रम याठिकाणी होत आहे आणि आज स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीजी उपलब्ध आहे आणि त्यांच्या हातून साडे पाच लाख बचत गटांना मोठ्या प्रमाणात revolving fund देऊन आमच्या महिलांच्या सक्षमीकरणाची सुरुवात आज याटठिकाणहून आपण करतो आहे. ही देखील अत्यंत आनंदाची गोष्ट आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आज ही नवीन योजना या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण करण्याचं आपण प्रयत्न करतो आहे. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात चार जाती आहेत महिला, युवा, शेतकरी आणि गरीब या चारही जातींना समर्पित आजचा कार्यक्रम आहे. कारण आज आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकरी सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजना या दोन्ही योजनांची मिळून 4700 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चालले आहेत.

मी मोदींजींचे त्याबद्दल आभार मानतो. त्याचसोबत आज मोदी आवास योजनेचं देखील सुरुवात होत आहे. या महाराष्ट्रातील 10 लाख कुटुंबांना मोदी योजना आवासच्या अंतर्गत स्वतःच घर आम्ही देणार आहोत. त्यात ही महिलांना घराचा संयुक्त मालकी हक्क मिळेल. याचसोबत मी मोदींजीचं आभार मानतो त्यांनी मागच्या काळामध्ये बळीराजा जलसिंचन योजनेअंतर्गत विदर्भातील 91 प्रॉजेक्टला पैसे दिले साडे कोटी हजार रुपये दिले त्यामुळे आज हे सगळे प्रॉजेक्ट पूर्ण होत आहेत. वर्धा ते कळंबपर्यंत रेल्वे ही मिळत आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा तातडीचा नाशिक दौरा,हेमंत गोडसेंसाठी शिंदे मैदानात

Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Rain Updates: हवामान विभागाचा इशारा; पुढील 7 दिवस 'या' जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अर्लट

MI VS KKR: मुंबई इंडियन्सची पुन्हा एकदा पराभव; कोलकाताचा 18 धावांनी विजय, KKR प्लेऑफसाठी पात्र

लोकसभेत का जायचंय? बीडच्या सभेत पंकजा मुंडेंनी सांगितलं खरं कारण, म्हणाल्या; "खासदार झाल्यावर..."