Devendra Fadnavis
Devendra Fadnavis  Team Lokshahi
राजकारण

मागील सरकार 'वर्क फॉर्म जेल' चालायचे, देवेंद्र फडणवीसांची महाविकास आघाडीवर जोरदार टीका

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्या दररोज कुठल्या ना कुठल्या कारणाने आरोप- प्रत्यारोपाचे सत्र सुरु आहे. याच गदारोळादरम्यान, राज्यात सध्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीची सरकारपक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आज अमरावतीत भाजपकडून सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

आज आपण पाहतो महाराष्ट्रात आपले सरकार आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेत्तृत्वात भाजप आणि इतर मित्र पक्षांचे सरकार आले. सहा महिन्यामंध्ये सरकार काय असत हे लोकांना कळायला लागले आहे. अडीच वर्ष सरकार बंदिस्त होते. ते दाराआड होत. फेसबुकवर लाईव्ह होत आणि लोकांमध्ये डेड होत. जनतेमध्ये हे सरकार दिसायचे नाही. मागच्या या सरकारचे दिसायचे काय ते फक्त वसुली दिसायची. वसुलीचे वेगवेगळे नवनवीन उच्चांक गेल्या सरकारमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाले. अशी टीका त्यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारवर केली.

पुढे ते म्हणाले की, मंत्र्यांपासून तर अधिकाऱ्यांपर्यंत आपण जेलमध्ये पाहताना बघितले. वर्क फॉर्म होम आपण बघितले असेल. परंतु त्या सरकारमध्ये आपल्याला वर्क फॉर्म जेल बघायला मिळाले. मंत्री जेलमध्ये गेल्यावर मुख्यमंत्र्यांमध्ये एवढी हिंमत नव्हती नैतिकता नव्हती जेलमध्ये गेलेल्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा. शेवटी आम्हालाच नवे सरकार स्थापन करून ते मंत्रीच हटवावे लागले. अश्या प्रकारे त्यांचा कारभार आपण थांबवला. जनादेशाचा अनादर करून आपल्या पाठीत खंजिर खुपसून हे अनैतिक सरकार आले होते. एकनाथजींचे मी आभार मानेल की हिंदुत्वासाठी, बाळासाहेबांच्या विचाऱ्यांसाठी त्यांनी हा मोठा उठाव केला. अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर बोलताना केली.

Rahul Gandhi : रायबरेलीतून राहुल गांधी यांना उमेदवारी जाहीर

मंधाना-शेफालीचा धमाका! टीम इंडियाची विजयी हॅट्ट्रिक; बांगलादेशचा धुव्वा उडवून T20 मालिका जिंकली

"धेर्यशील माने किंवा इतर उमेदवार महत्त्वाचे नाहीत, कारण...", हातकणंगलेत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Daily Horoscope 3 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष ३ मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना