राजकारण

मुक्ताईनगरात एकनाथ खडसेंना धक्का; शिंदे गटाची मुसंडी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुक्ताईनगर : राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणी सुरु आहे. अशातच, मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना धक्का बसला आहे. मुक्ताईनगर तालुक्यात 3 जागांवर शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे. याशिवाय गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघांमध्ये 17 पैकी 17 ग्रामपंचायतवरती भाजपने निर्विवाद यश मिळवले आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील चारपैकी तीन ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने बाजी मारली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी ग्रामपंचायतीवर शिंदे गटाच्या मंदाकिनी कोळी, वडवे ग्रामपंचायतवर शिंदे गटाचे शिवराम कोळी, चिखली ग्रामपंचायत वर शिंदे गटाचे वैभव पाटील सरपंच पदी विराजमान झाले आहेत. तर, पिंपरी नांदू ग्रामपंचायतीवर एकनाथ खडसे समर्थक प्रतिभा अशोक पाटील सरपंच पदी विराजमान झाल्या आहेत.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी जामनेर मतदारसंघांमध्ये जाऊन प्रचार केला होता. मात्र तरीही सरकारचे संकट मोचक ओळखले जाणाऱ्या गिरीश महाजनांचा जामनेरमध्ये एकतर्फी विजय मिळवला आहे. याठिकाणी जामनेर मतदारसंघांमध्ये 17 पैकी 17 ग्रामपंचायतीवरती भाजपने निर्विवाद यश मिळाले आहे. त्यामुळे येथेही एकनाथ खडसे यांना धक्का बसला आहे.

"छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल, तर..."; अमोल कोल्हेंनी भाजपवर डागली तोफ

देश तोडण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला अमित शहांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "भारताचं विभाजन..."

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...

India Alliance Meeting : बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तिप्रदर्शन, मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार सभा