Jayant Patil
Jayant Patil Team Lokshahi
राजकारण

शिवसेना-वंचित युतीला राष्ट्रवादीचा विरोध? जयंत पाटील स्पष्टच बोलले...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेना वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर राष्ट्रवादी नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना आणि वंचित युतीला आमचा विरोध नाही. कुणी आमच्या आघाडीबरोबर चर्चा करुन ऐनवेळी बाजूला जाऊ नये याची काळजी आघाडीतील प्रमुख घटकांनी घ्यावी अशी इच्छा आणि सतर्कता जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उध्दव ठाकरे गट) यांनी कुणाशीही चर्चा केली आणि नवे मित्र जोडले तरी कुणाचा विरोध नाही. परंतु, मित्र जोडताना ते मित्र शेवटपर्यंत राहतील आणि निवडणूक आपल्याबरोबर लढवतील याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

कसबा व चिंचवडबाबत महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र बसतील व त्यावर निर्णय होईल. चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त असल्याने कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन चर्चा केली जाईल. तसेच, वातावरण निर्माण करण्यासाठी मागण्या, घोषणा, ठराव करण्याचे कार्यक्रम सध्या भाजपकडून सुरू आहेत, असेही त्यांनी म्हंटले आहे.

सध्या विरोधकांवर दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न चिंचवडमध्ये भाजप करत आहे. मात्र खरी चौकशी तर पिंपरी - चिंचवड महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची करायला हवी. त्याठिकाणी चौकशी केली तर भाजपचा किती भ्रष्टाचार आहे हे स्पष्ट होईल, असा निशाणा जयंत पाटलांनी भाजपवर साधला आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्यात सध्या जे प्रश्न सुरु आहेत त्याबद्दल चर्चा झाल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.

मारुतीला पानांचा हार अर्पण करण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या...

Nana Patole On PM Modi: नरेंद्र मोदींचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा नाना पटोले यांनी लावला घणाघाती आरोप

Daily Horoscope 08 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना मेहनतीचं आवक फळ मिळणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 08 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

Rupali Chakankar: EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल