राजकारण

मुंब्य्रात उद्धव ठाकरेंचे पोस्टर फाडले; जितेंद्र आव्हाड म्हणाले...

Published by : Siddhi Naringrekar

मुंब्य्रातील शिवसेना शाखेच्या वादानंतर आता उद्धव ठाकरेंचे पोस्टर फाडल्याने मोठ्या संघर्षाची शक्यता आहे. मुंब्य्रातील रस्त्यावर लावलेले उद्धव ठाकरेंचे पोस्टर अज्ञाताने फाडले आहेत. याआधी शाखेवरून शिवसेना-ठाकरे गटात राडा झाला होता.

याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी स्वतः मुंब्रा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकांना भ्रमण ध्वनिवरून संपर्क करुन, पक्षप्रमुख श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वागतासाठी मुंब्रा ते ठाणे या भागात लावलेले होर्डिंग्ज फाडण्यात येतील,अशी शंका व्यक्त केली होती.

यावर त्यांनी,"असे काहीही होणार नाही,आपण निश्चिंत रहा,आमची सर्वत्र नजर आहे",अस मला मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले होते. आज दूपारी उद्धव साहेबांचा ठाण्यात कार्यक्रम होणार आहे.त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने हे होर्डिंग्ज शहरात लावलेले होते.यातील 90% होर्डिंग्ज आता फाडण्यात आले आहेत.मागील वर्षभरात आम्हाला असे अनेक अनुभव आलेले आहेत.

एक होर्डिंग फाडायला किमान 15 मिनिट तरी लागतात.आणि "सर्वत्र नजर असणाऱ्या" पोलिसांच्या मदतीशिवाय हे होऊच शकत नाही.आता पोलीस मला म्हणत आहेत की,"उद्धव साहेबांना आम्ही मुंब्र्यात येऊच देणार नाहीत..!" असो, तरीदेखील मी मुंब्रा पोलीस स्टेशनचे आणि @ThaneCityPolice यांचे आभार मानतो.ते "त्यांची ड्युटी" मोठ्या निष्ठेने करत आहेत. "मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है,जो मंजुरे खुदा होता हैं..!"

"माझ्या पाठीत नाही, मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत वार केला"; उद्धव ठाकरेंची PM मोदींवर घणाघाती टीका

महाविकास आघाडीला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही - एकनाथ शिंदे

Alia Bhatt MET GALA Look 2024: 'मेट गाला २०२४'मध्ये आलियाने केला 'हा' खास लूक, पाहा फोटो...

Daily Horoscope 09 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या जीवनात घडणार महत्त्वाचे बदल; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 09 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना