राजकारण

सोमय्यांचे मिशन अनिल परब! शिंदे-फडणवीसांना पत्र, केली 'ही' मागणी

Published by : Team Lokshahi

मुंबई : शिवसेनेचे संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्राचाळ प्रकरणात ईडीने (ED) अटक केलेली असतानाच भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आपला मोर्चा आता शिवसेना उपनेते अनिल परब (Anil Parab) यांच्याकडे वळवला आहे. सोमय्यांनी पत्र लिहीत वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे.

किरीट सोमय्या यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीले आहे. यामध्ये अनिल परब यांचे दापोली येथील मुरुड समुद्र किनाऱ्यावर साई रिसॉर्ट आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सी कौंच रिसॉर्ट अनधिकृतरित्या बांधले. यावेळी सीआरझेडचा भंग झालेला असल्याने हे रिसार्ट पाडण्याचे आदेश महसूल विभाग, महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण, पर्यावरण मंत्रालय, जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी यांना 3 जानेवारी रोजी दिले आहेत.

गेली अनेक महिने पाठपुरावा केल्यानंतरही हे रिसॉर्ट तोडण्याच्या दिशेने जाणीवपूर्वक कोणतीही कारवाई केलेली नाही. अजूनपर्यंत या दोन्ही रिसॉर्टचे पाणी आणि वीजही कापली नाही. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी हात केले आहे. पर्यावरण सचिव महाराष्ट्र व महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण यांनी मिलीभगतने दुर्लक्ष करीत आहेत. शिंदे सरकारने आता ताबडतोब या रिसॉर्टचे वीज पाणी कापण्याचे निर्देश द्यावे. तसेच रिसॉर्ट तोडण्यासंबंधी कार्यवाही करावी, अशी विनंती किरीट सोमय्या यांनी केली आहे.

यासंदर्भातील लेखी निवेदन सोमय्या यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे दिले आहे. या निवेदनावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे यावेळी भाजपा व शिंदे गटाविरोधात शिवसेना असा तिरंगी सामना रंगण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंचा उजवा हात असणारे राऊत जसे तुरुंगात गेले तसा डावा हातही तुरुंगात जाणार, असे विधान किरीट सोमय्यांनी सोमवारी केले होते. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. तर, भाजप नेते राणे कुटुंबियही सातत्याने संजय राऊतांनंतर अनिल परबांचा नंबर लागणार असल्याचा दावा करत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा