राजकारण

संजय राऊतांच्या स्वरुपात हा कादर खान, संजय राऊतांना मनसेचे जोरदार प्रत्युत्तर

Published by : Sagar Pradhan

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा काल रविवारी नेस्को येथे गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी सर्वच राजकीय विषयावर बोलताना चौफेर टीका केली. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नक्कल करत त्यांच्यावर टीकास्र सोडले. त्यावरच उत्तर देतांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. “राजकारण म्हणजे मिमिक्री नाही. आम्हाला जर मिमिक्री पाहायची असेल, काही मुद्रा अभिनय, नाट्य अभिनय पाहायचा असेल तर आम्ही जॉनी लिव्हरला पाहू, आम्हाला राजू श्रीवास्तव आवडायचा” अशी टीका शिवसेना राऊत यांनी केली. त्यावरूनच आता मनसे नेते गजानन काळे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी करत गजानन काळे म्हणाले की, गेल्या शंभर दिवसांपासून महाराष्ट्रातील जनता कादर खान यांच्यासारख्या अभिनयाला मुकली होती. वंचित झाली होती. संजय राऊतांच्या स्वरुपात हा कादर खान आता दररोज आक्रस्ताळेपणा करून अभिनय करत आहे. कादर खान यांच्यासारखं रोज सकाळी उठून आक्रस्ताळेपणा करणे म्हणजे राजकारण आहे का? असा सवाल काळे यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणालासुद्धा काँग्रेसवाले मिमिक्री म्हणायचे. आज याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लाळघोटेपणा संजय राऊत करत आहेत. त्यांचीच भाषा बोलत आहेत. हे दुर्दैव आहे. तुमच्या पोपटपंचीला आता जनता कंटाळली आहे. लोक तुम्हाला ‘शिल्लक सेना’ असं म्हणू लागले आहेत. ४० आमदार आणि खासदारांसह नगरसेवक पक्ष सोडून गेले आहेत. मात्र, संजय राऊतांच्या बेताल विधानांमुळे आता उरलेली ‘शिल्लक सेना’ही संपते की काय? असं लोकांना वाटत आहे. अशी टीका काळे यांनी केली.

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...

India Alliance Meeting : बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तिप्रदर्शन, मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार सभा

Anil Deshmukh : तटकरे साहेब हॉटेलमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना भेटले; आमच्या संपर्कात जरी ते आले तरी आम्ही त्यांना घेणार नाही

Kejriwal Meet Thackeray : इंडिया आघाडीच्या सभेआधी केजरीवाल घेणार ठाकरेंची भेट

पुन्हा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील चित्रपटाची टीम राज्यभर दौऱ्यावर