राजकारण

रामनवमी भारतात नाही तर पाकिस्तानात साजरी करायची का? मनसेचा फडणवीसांना संतप्त सवाल, नेमके प्रकरण काय?

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यभरात रामनवमीच्या उत्सवाची लगबग सुरु झाली आहेत. मंदिरे सजली जात असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. अशातच, पुण्यात अनेक ठिकाणी रामनवमी साजरी करण्यासाठी पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात येत असल्याचा दावा मनसेने केला आहे. तसेच, यावरुन मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संतप्त सवाल विचारला आहे. रामनवमी भारतात नाही तर पाकिस्तानात साजरी करायची का? असा प्रश्न त्यांनी केला आहे.

राज्यभरात ३० एप्रिल रोजी रामनवमी सर्वत्र साजरी होत आहे. या निमित्ताने पुण्यासह राज्यात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असतं. मात्र, पुण्यातील शिवाजीनगर, वानवडी या भागात पोलिसांकडून या कार्यक्रमाला परवानगी देत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता साईनाथ बाबर यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले आहे.

पुण्यात काही ठिकाणी रामनवमी साजरी करण्यासाठी पोलिस प्रशासन परवानगी देत नाही मला उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांना विचारायचं आहे की रामनवमी भारतात साजरी करायची नाही तर मग काय पाकिस्तानात साजरी करायची का, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच, मनसे रामनवमीच्या कार्यक्रमांना परवानगी मिळावी, यासाठी पत्रही देणार आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा सभेत माझी तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की येणारी रामनवमी जोरदार साजरी करा. येत्या ६ जून २०२३ ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यावेळेला मी स्वतः रायगडावर जाणार आहे. तुम्ही पण या, असे आवाहन त्यांनी केले होते.

Daily Horoscope 07 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 07 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

ICSE 2024 Results: आयसीएसई बोर्डाचा १०वी, १२वीचा निकाल जाहीर; यंदा मुलींनी मारली बाजी!

Rohit Pawar: रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...

Rice Water: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या...