राजकारण

'अमेरिकेत राष्ट्रपती पदासाठी उद्धव ठाकरे राहणार उभे, संजय राऊत प्रचार करणार'

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : 2024 च्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचा चेहरा असतील, असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकशाहीवर केला आहे. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत असून भाजप नेते मोहित कंबोज यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेचे पंतप्रधान उमेदवारीसाठी देखील उद्धव ठाकरे उभे राहणार आहेत. पुढच्या महिन्यात संजय राऊत तिथे जाऊन प्रचार देखील करणार आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे.

सर्वांना होळीच्या शुभेच्छा. होळी सगळ्यांना सुखाची आणि सुखरूप होळी जाऊदेत. विशेष करून देशाचे लोकप्रिय भावी पंतप्रधान यांना देखिल होळीच्या शुभेच्छा. माझ्याकडे एक पक्की माहिती आहे ती म्हणजे अमेरिकेचे पंतप्रधान उमेदवारीसाठी देखील उद्धव ठाकरे उभे राहणार आहेत. पुढच्या महिन्यात संजय राऊत तिथे जाऊन प्रचार देखील करणार आहेत. उध्दव ठाकरेंना अमेरिकेचे पुढचे राष्ट्रपती बनण्यासाठी शुभेच्छा, अशी खोचक टीका मोहित कंबोज यांनी केली आहे.

दरम्यान, संजय राऊत यांचं राजकारण डबल ढोलकी बदडल्याप्रमाणे झालं आहे. महाविकास आघाडीची स्थापना झाली तेव्हा यूपीएचे नेतृत्व शरद पवारांनी करावं असं राऊत म्हणत होते. मध्यंतरी राहुल गांधी यांनी करावं असे सुचवलं. मात्र, आता राहुल गांधी बॅकफुटवर असून त्यांच्या जागी उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व करावं, असं सूचक वक्तव्य राऊतांनी केले आहे. एवढंच नाही तर ठाकरे दिल्लीला राहायला जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी राऊतांपासून सावध राहावं, अशी टीका भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.

Daily Horoscope 29 April 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 29 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

फडणवीसांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना धाराशिवमध्ये धरलं धारेवर; म्हणाले, "मोदींच्या ट्रेनमध्येच..."

T20 World Cup Selection : धावांचा पाऊस पाडणाऱ्या के एल राहुलचा पत्ता कट? भारतीय संघात 'या' दिग्गज खेळाडूंची केली निवड

"...म्हणून नरेंद्र मोदींच्या अंगात औरंगजेब संचारलाय"; संजय राऊतांनी सासवडमध्ये महायुतीवर डागली तोफ