राजकारण

जागे व्हा उद्धवजी, जरा तरी व्हा ताठ; शिंदे गटाचा घणाघात, गिधाडांपुढे झुकून...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : इंडिया आघाडीची मुंबईत आज महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर शरसंधान साधण्यात येत आहे. तर, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी कविता ट्विट करीत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. जागे व्हा उद्धवजी, जरा तरी व्हा ताठ, गिधाडांपुढे झुकून तुम्ही सोडताय हिंदुत्वाचा काठ, अशा शब्दात नरेश म्हस्केंनी उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

काय आहे नरेश म्हस्केंची कविता?

ज्यांनी तुम्हांला जन्माला घातलं

त्यांच्या विचारांना तिलांजली दिली

असंगाशी संग, दुश्मनाशी दोस्ती केलीत

साहेब म्हणायचे,ज्या दिवशी काँग्रेस सोबत जायची वेळ येईल

त्या दिवशी माझं दुकान बंद होईल

स्वविकासाचा अजेंडा घेऊन आलीय

I.N.D.I.A गिधाडांची टोळी

यांनीच 60 वर्षांत केली देशाच्या विकासाची होळी

हिंदूना नि हिंदुत्वाला संपवण्याचा यांचा डाव

आणि हे साहेब देतायत यांना 'सोनियाचा' भाव

जागे व्हा उद्धवजी,

जरा तरी व्हा ताठ

गिधाडांपुढे झुकून तुम्ही सोडताय हिंदुत्वाचा काठ

लाज ठेवा रे उबाठासैनिकांनो

मूळ आपलं विसरलाय

हिंदुत्वाची कास सोडून

लांडग्यांच्या कळपात सामील झालाय

आघाडीचं नाव यांना #INDIAAlliance ठेवावं लागतंय

लोकांना मात्र यांच्यामध्ये भारतीयत्व शोधावं लागतंय..

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा

मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

World Hypertension Day 2024 : 'जागतिक उच्च रक्तदाब दिवस' कधी आणि का साजरा केला जातो?

"४ तारखेनंतर टरबूजचा भाव उतरणार आहे"; उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका

Daily Horoscope 17 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना साडेसातीचाही होणार त्रास; पाहा तुमचे भविष्य