राजकारण

Nawab Malik : नवाब मलिक अनिल पाटलांच्या कार्यालयात दाखल

Published by : Siddhi Naringrekar

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. नवाब मलिक वैद्यकीय जामिनावर बाहेर आहेत आणि आज नवाब मलिक हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये ईडीनं गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली नवाब मलिक यांना अटक केली होती. 11 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयानं मलिकांना मोठा दिलासा देत, वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला. नवाब मलिक आज विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार आहे.

अधिवेशनात मलिक हे अजित पवार गटाच्या आमदारांसोबत बसतात, की शरद पवार गटाच्या आमदारांसोबत बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी नवाब मलिक अजित पवार गटासोबत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र नवाब मलिक यांनी याबद्दल काही प्रतिक्रिया दिली नाही आहे.

आता नवाब मलिक नागपूर विधानभवनात दाखल झाले आहेत. तसेच नवाब मलिक अनिल पाटलांच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. अनिल पाटील हे अजित पवार गटाचे मुख्य प्रतोद आहेत.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil : 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार