Jitendra Awhad
Jitendra Awhad Team Lokshahi
राजकारण

जामीन मिळाल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया; म्हणाले, एखाद्या बाईला पुढे करुन...

Published by : Sagar Pradhan

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाच्या गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. याच विनयभंगाच्या गुन्ह्यावर आज ठाणे कोर्टात सुनावणी झाली आहे. यामध्ये आव्हाडांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. ठाणे कोर्टाने जितेंद्र आव्हाड यांना विनयभंगाच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यावरच जामीन मिळाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले आव्हाड?

राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांना जामीन मिळाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मला पूर्ण अभ्यास केल्यानंतर लक्षात आले, पूर्ण गर्दीमध्ये एक स्त्री चालत येतेय. मी खासदार श्रीकांत शिंदे यांना बाजूला केले. त्या बाई समोरुन चालत आल्या. मी बाजूला केले नसते तर त्या माझ्या अंगावरच आल्या असत्या. मग मला स्वत:ला सावरण्याची आणि सुरक्षेची कोणतीही संधी मिळाली नसती. मग त्या महिलेने आरोप केला असता की जितेंद्र आव्हाड स्वत:हून माझ्या अंगावर आले, असे आव्हाड यावेळी बोलताना म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, देवाने मला काय बुद्धी दिली. मी त्यांना हलक्या हाताने सांगितलं की, बाजूला व्हा. एवढ्या गर्दीत कशाला जाताय? बाजूला व्हा, हे वाक्य व्हिडीओत ऐकू येत आहे, इतक्या घाणेरडा किळसवाणा प्रकार, प्लॅनिंग करायचा, त्याला वरुन आशीर्वाद मिळवायचे. इतके बदनामीचे षडयंत्र रचने आणि एखाद्याला राजकीय आणि सामजिक जीवनामधून उद्ध्वस्त करण्यासाठी कारस्थान रचायचे यामध्ये आनंद कसला?”, असा सवाल त्यानी उपस्थित केला.

मला परवाही अटक केली. त्यावर कोर्टाने जो निकाल दिलाय, अटक करण्याच्या प्रक्रियेतच तुम्ही चुकी केलीय, असं कोर्टाने स्पष्ट म्हटलं आहे. पूर्ण घटना व्हिडीओत आहे. गुन्हा दाखल करण्याआधी तो व्हिडीओ तरी पाहायला होता. कलम 354 दाखल करण्यासाठी काही नियम आहेत. पण काही न वाचता डायरेक्ट गुन्हे दाखल करायचे. पोलीस वरुन खूप दबाव असल्याचं सांगतात. हवलदार पासून डीसीपी, सीपीपर्यंत सर्व वरुन दबाव असल्याचं सांगतात. महाराष्ट्राच असं कधी बघितलं नव्हतं. एखाद्या बाईला पुढे करुन महाभारतासारखं नीच राजकारण केलं गेलं. याच शकुनी कोण ते मला माहीत नाही. अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Daily Horoscope 4 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचे वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

'आमचं सरकार आलं तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू' राहुल गांधींची मोठी घोषणा

Garlic: उन्हाळ्यात 'या' लोकांनी लसूण खाणे टाळावे

Cold Water: माठातील पाणी फ्रिजसारखं गार कसं करायचं? जाणून घ्या...