Rohit Pawar | Raj Thackeray
Rohit Pawar | Raj Thackeray  Team Lokshahi
राजकारण

मी राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन, रोहित पवारांचा टोला

Published by : Sagar Pradhan

महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यात प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. दोन्ही राज्यातील राजकीय भयानक तापलेले असताना, कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील मंत्र्यांना येण्यास बंदी घातली असली तरी आज राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी बेळगाव दौरा केला. यावेळी त्यांनी विविध ठिकाणांना भेटी देत महाराष्ट्र एकीकरण समितीमधील नेत्यांच्या भेटीही घेतल्या.

रोहित पवार यांनी बेळगावहून कोल्हापूरमध्ये आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आमचे नेते 19 तारखेला जो आदेश देतील तो पाळला जाईल, ज्या कोणत्या नेत्याला बेळगावला जाण्यास सांगतात त्याचे पालन करतील, असेही नमूद केले. यावेळी त्यांनी राज ठाकरेंबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी खोचक शब्दात टिप्पणी केली. मी राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन असल्याचे रोहित पवार म्हणाले. मात्र, आता ते कुठेतरी भाजपचा विचार घेऊन पुढे जात असल्याचे दिसून येत आहे. राज ठाकरे यांनी आता स्वतःची ओरिजनल स्टाईल कायम ठेवावी. भाजप आपली राजकीय पोळी भाजून घेत असेल, तर त्याला आपण पाठिंबा का द्यायचा? राजकारण हे तात्पुरते असते, विचार हे दीर्घकालीन असतात, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

सामान्यांना केंद्रबिंदू ठेवून साहेब काम करत आहेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निनावी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावर रोहित पवार यांनी भाष्य केले. शरद हे देशाचे मोठे नेते आहेत, असे अनेक फोन, धमक्या या आधी सुद्धा आल्या आहेत. मात्र, सामान्यांना केंद्रबिंदू ठेवून साहेब काम करत आहेत. महाराष्ट्रात खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे, अशा येणाऱ्या धमक्यांबाबत काळजी घेतली पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

IPL 2024 : चेन्नई आणि लखनऊ संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर, प्ले ऑफचं स्वप्न भंगलं?

टी-२० वर्ल्डकपआधी भारताच्या अडचणी वाढल्या, कर्णधार रोहित शर्माला दुखापत, 'या' खेळाडूनं दिली मोठी अपडेट

"४ जूनला आमचं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणार"; रत्नागिरी-चिपळूणमध्ये आदित्य ठाकरेंनी पेटवली 'मशाल'