राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध; जाहीरनाम्यात 'हे' महत्त्वाचे मुद्दे

Published by : Dhanshree Shintre

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यात शेतकरी, कामगार महिला, विद्यार्थी यांच्यावर विशेष लक्ष्य देण्यात आले आहे. तसेच महिलांचे आरक्षण, महिलांची सुरक्षा या मुद्यांवरही भाष्य करण्यात आले आहे. आज सकाळी पत्रकार परिषदेत हा जाहीरनामा सादर करण्यात आला. यावेळी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षातील महत्वाचे नेते उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना या जाहीरनाम्याचे वाचन केले. या जाहीरनाम्याला शपथनामा हे नाव देण्यात आले आहे.

तसेच जातनिहाय जनगणना, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव यांसारख्या राष्ट्रीय मुद्यांवरही भाष्य करण्यात आले आहे. या जाहीरनाम्यात नेमक्या काय बाबी नमुद करण्यात आल्या आहेत त्या जाणून घेऊयात...

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे

- गॅसच्या किमती निश्चित करु, सबसिडाईस करु

- पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रीत करु

- शासकीय रिक्त जागा भरु

- शासकीय नोकर्यांमध्ये महिलांचे आरक्षण 50 टक्के करण्याचा आग्रह धरु.

- जीएसटी मध्ये बदल करु. जीएसटीमध्ये राज्यांना अधिकार देऊ

- ॲप्रेटीस विद्यार्थ्यांना 8500 रुपये स्टायपेंड देऊ

- स्पर्धा परीक्षाचे शुल्क माफ करु

- महिलांना विधानसभा लोकसभेत आरक्षण देण्याचा प्रयत्न करणार

- हमीभाव, आयात निर्यात, कर्जमाफी यासाठी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग निर्माण करु.

- शासकीय क्षेत्रात कंत्राटी कामगारांना पायबंद घालु

- जात निहाय जनगणाना करु, त्यासाठी आग्रह धरु

- आरक्षणाची 50 टक्क्यांची अट बदलु

- खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण ठेऊ

- ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणार

- अल्पसंख्यांकासाठी सच्चर आयोगाच्या शिफारशींसाठी अंमलबजावणी करु

- शिक्षणाची अर्थसंकल्पीय तरतुद ६ टक्क्यांपर्यंत करु

- शेती आणि शैक्षणिक वस्तुंवर शुन्य टक्के जीएसटी ठेवणार

- अग्निवीर योजना रद्द करणार

- वन नेशन वन इलेक्शनला विरोध. ईव्हीएमवरील लोकांचा विश्वास उडत चालला आहे.

- महालक्ष्मी योजना, गरीब महिलांना प्रती वर्ष एक लाख देणार

- रेशनवर कडधान्य देणार

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil : 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार