Nitin Gadkari
Nitin Gadkari Team Lokshahi
राजकारण

आता गडकरींचाही योगी पॅटर्न ? 'तर बुलडोझर फिरवेन'; आक्रमक गडकरींच्या वेगळ्याच रूपाची राज्यभर चर्चा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

संजय देसाई | सांगली : रस्त्याच्या कामात जर गडबड कराल तर थेट बुलडोजर घालू, असा सज्जड दमच केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ठेकेदाराला दिला आहे. सांगलीच्या अष्टा या ठिकाणी पेठ सांगली रस्त्याच्या चौपदरीकरण भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या वक्तव्याची आता चांगलीच चर्चा रंगली आहे.

सांगली शहराला पुणे-बंगळुरू महामार्गाला जोडणारा पेठ-सांगली रस्ता हा गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. या रस्त्यावर असणारे खड्डे आणि रस्त्याचे झालेलं अर्धवट काम यामुळे वाहनधारक नागरिकांमधून सरकार विरोधात नेहमीच रोष व्यक्त करण्यात येत होता आणि हा रस्ता केंद्राच्या माध्यमातून करण्यासाठी खासदार, आमदार यांनी पाठपुरावा केला होता. आणि अखेर केंद्रीय राष्ट्रीय रस्ते विभागाच्या माध्यमातून हा रस्ता सांगली पेठ चौपदरीकरण रस्ता करण्यात येत आहे. या रस्त्याचे या कामाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमांमध्ये बोलताना केंद्रीय रस्ते पर्यावरण मंत्री नितीन गडकरी यांन हा रस्ता या कामाला एक महिन्यात सुरुवात होईल. त्यानंतर पुढील 25 वर्ष या रस्त्यात एकही खड्डा पडणार नाही. अशा पद्धतीचे काम केलं जाईल, असा विश्वास व्यक्त करत मी रस्त्याच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची टक्केवारी घेत नाही, या रस्त्याच्या कामात ठेकेदारांनी गडबड करता कामा नाही अन्यथा ठेकेदाराला बोललो तर खाली टाकू, अशा शब्दात नितीन गडकरींनी दम भरला आहे.

या कार्यक्रमासाठी सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भाजपाचे खासदार संजय पाटील, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, राष्ट्रवादीचे आमदार सुमन पाटील, मानसिंगराव नाईक मंडळी उपस्थित होते.

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

IPL 2024 : चेन्नई आणि लखनऊ संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर, प्ले ऑफचं स्वप्न भंगलं?

टी-२० वर्ल्डकपआधी भारताच्या अडचणी वाढल्या, कर्णधार रोहित शर्माला दुखापत, 'या' खेळाडूनं दिली मोठी अपडेट

"४ जूनला आमचं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणार"; रत्नागिरी-चिपळूणमध्ये आदित्य ठाकरेंनी पेटवली 'मशाल'