राजकारण

मोठी बातमी! मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव फेटाळला

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव फेटाळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर मतदान झाले. आवाजी मतदानाने अविश्वास प्रस्ताव फेटाळला. यानंतर संसदेचे कामकाज सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. दरम्यान, अधीर रंजन चौधरी यांचे तात्पुरतं निलंबन करण्यात आले.

लोकसभेत विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर सलग तीन दिवस चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर दिले. 2 तास 12 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. परंतु, पंतप्रधान मोदींनी मणिपूरवर भाष्य करावे, अशी मागणी करत विरोधकांनी सभात्याग केला. यानंतर अखेर मोदींनी मणिपूरवरही वक्तव्य केलं. मणिपूरमध्ये लवकरच शांततेचा सूर्य उगवेल, असे पंतप्रधानांनी म्हंटले.

तर, अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले, 2018 मध्ये, सभागृह नेता या नात्याने मी त्यांना 2023 मध्ये अविश्वास प्रस्ताव आणण्याचे काम दिले होते. आता मी त्यांना 2028 मध्ये आणण्याचे काम देत आहे, पण किमान तयारी करून या, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, शुक्रवारी लोकसभेत मणिपूरवर चर्चा होणार आहे. यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केले जाईल. कारण शुक्रवार 11 ऑगस्ट हा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे.

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...