Gunratna Sonawane
Gunratna Sonawane Team Lokshahi
राजकारण

माझ्यावरील हल्ल्याला विरोधक जवाबदार, शाईफेकीनंतर सदावर्ते यांचा संताप

Published by : Sagar Pradhan

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत जोरदार राडा झाला. सोलापूर येथे पत्रकार परिषद घेत असताना सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडकडून शाई फेक करण्यात आली. सदावर्ते यांनी स्वतंत्र मराठवाडा राज्याची मागणी केल्यानंतर त्यांच्याविरोधात संभाजी ब्रिगेड आणि इतर संघटनांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. मात्र, या शाईफेकीनंतर सदावर्ते यांनी संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले सदावर्ते?

शाईफेक झाल्यानंतर गोंधळ निर्माण झाला. मात्र या दरम्यान काही अनुचित घडू नये म्हणून पोलिसांनी त्यांना बसमध्ये बसवले. बसमध्ये बसल्यानंतर सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीने पोलिसांवरच राग काढला. तुम्ही बेजाबाबदार आहात. यू आर रिस्पॉन्सिबल. तुम्ही त्या हल्लेखोरांसोबत आहात, असा आरोप सदावर्ते यांनी केला. पोलीस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. पण सदावर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी पोलिसांवर आगपाखड करण्यास सुरुवात केली.

तुम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचं काम करत आहात, असा आरोपही सदावर्ते यांनी यावेळी केला. तर ज्यावेळी हल्ला झाला तेव्हा तुमचा कोणताही पोलीस घटनास्थळी हजर नव्हता, असं सदावर्ते यांच्या पत्नीने सांगितलं. यावेळी सदावर्ते यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही टीका केली. उद्धव ठाकरे हे बिळातले मुख्यमंत्री होते. या लोकांना माझी संविधान संवाद यात्रा होऊ द्यायची नाही. त्यामुळेच माझ्यावर हल्ला करण्यात आल्याचे सदावर्ते यावेळी म्हणाले.

Daily Horoscope 4 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचे वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

'आमचं सरकार आलं तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू' राहुल गांधींची मोठी घोषणा

Garlic: उन्हाळ्यात 'या' लोकांनी लसूण खाणे टाळावे

Cold Water: माठातील पाणी फ्रिजसारखं गार कसं करायचं? जाणून घ्या...