राजकारण

अजितदादा गोविंदबागेत अनुपस्थित; पार्थ पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबाचा पहिलाच दिवाळी पाडवा गोविंदबागेत पार पडला. परंतु, आज पहिल्यांदाच अजित पवारांशिवाय दिवाळी पाडवा पार पडला.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बारामती : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबाचा पहिलाच दिवाळी पाडवा गोविंदबागेत पार पडला. या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहणार का याची सर्वांनाच उत्सुकता होती. परंतु, आज पहिल्यांदाच अजित पवारांशिवाय दिवाळी पाडवा पार पडला. अजित पवारांनी या कार्यक्रमाला भेट दिली नसल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. मात्र, अशातच अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्याचे समजत आहे.

दिवाळीनिमित्त संपूर्ण पवार कुटुंबिय बारामतीत आहेत. गोविंदबागेत दरवर्षी पवार कुटुंबिय कार्यकर्त्यांची भेट घेऊन शुभेच्छा स्वीकारतात. मात्र, अजित पवार बारामतीतत असूनही पाडवा कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. यावर सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्या प्रकृती अस्वस्थतेचे कारण दिलं. परंतु, दुसरीकडे अजितदादांनी काटेवाडीतील किल्ल्याची पाहणी केली. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. अशातच, आता पार्थ पवारांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. पाडव्यानिमित्त पार्थ पवारांनी गोविंदबागेत येवून शरद पवारांची भेट घेतली. या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, महायुतीत सामील झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत अजित पवारांनी निधी वाटपावरुन आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवल्याचंही समजत आहेत. यावरुन विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सवात बाप्पाच्या विविध रुपांचे रहस्य; प्रत्येक मूर्तीचा खास अर्थ, जाणून घ्या...

Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाच्या प्राण प्रतिष्ठेची तयारी झाली! , आताच चेक करा 'या' गोष्टी आणल्या आहेत का ते?

Donald Trump Vs India : ट्रम्पकडून भारताला दुसरा मोठा धक्का?; लाखो भारतीयांच्या नोकऱ्यांवर गदा

Mumbai cha Raja 2025 : यंदा मुंबईच्या राजाच्या मुकुटावरील 'हा' पोपट काहीतरी खास सांगतोय... काय आहे, जाणून घ्या...