राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी केले तोंडभरून कौतुक; गतिशील आणि कष्टाळू...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबासहित त्यांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये जवळपास दोन ते सव्वादोन तास चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांनी या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर आता पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले आहे.

अजित पवार लवकरच मुख्यमंत्री बनण्याचे संकेत अमोल मिटकरींनी ट्विटरद्वारे दिले होते. अशातच, एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधत भेटीबाबतची माहिती दिली आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. पंतप्रधानांची सदिच्छा भेट घेण्याची माझ्या कुटुंबाची इच्छा होती, त्यामुळे आज आम्ही त्यांना भेटलो, असे शिंदे यांनी सांगितले.

यानंतर आता एकनाथ शिंदेंच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले आहे. महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीची त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौतुकास्पद आहे, असे कौतुक मोदींनी शिंदेंचे केले आहे.

दरम्यान, गेले वर्षभर केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ राज्य सरकारला मिळत आहे. ते सहकार्य यापुढेही कायम मिळो, ही मागणी मान्य करत पंतप्रधानांनी आश्वस्तही केले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. पंतप्रधानांची आपुलकी, आशीर्वादाचा हात आणि आस्था नवे बळ देणारी आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप