राजकारण

राज ठाकरेंनी घेतली चंद्रशेखर बावनकुळेंची भेट; युती होणार?

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते नेत-पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. अशात आज राज ठाकरे यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. या भेटीत कोणती चर्चा होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

राज ठाकरेंनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी त्यांची भेट घेतली आहेत. यावेळी बावनकुळे यांच्या कन्यांनी राज ठाकरे यांचे स्वागत केलं. ही सदिच्छा भेट असली तरीही या भेटीत निश्चितच राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे. मागच्या काही दिवसांपासून मनसे-भाजप युतीची चर्चा आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

याआधीही काही आठवड्यांपूर्वीच राज ठाकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाली होती. मुंबईत राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट झाली होती. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती. यामुळे राज्यात नवे राजकीय समीकरण पाहयला मिळण्याचा अंदाज सर्वच स्तरावरुन लावण्यात येत आहे. भाजपा, शिंदे-मनसेची वाढती जवळीक आगामी निवडणुकीत शिवसेनेची डोकेदुखी बनण्याचीही शक्यता आहे.

मारुतीला पानांचा हार अर्पण करण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या...

Nana Patole On PM Modi: नरेंद्र मोदींचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा नाना पटोले यांनी लावला घणाघाती आरोप

Daily Horoscope 08 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना मेहनतीचं आवक फळ मिळणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 08 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

Rupali Chakankar: EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल