राजकारण

Ram Shinde on Rohit Pawar : अजितदादांच्या उशाला पत्र ठेवलं असतं तर त्यांनी वाचलं असतं

Published by : Siddhi Naringrekar

अहमदनगरमध्ये पाटेगाव खंडाळा एमआयडीसी व्हावी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची मागणी आहे. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता भाजप आमदार राम शिंदे यांनी रोहित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. राम शिंदे म्हणाले की, रोहित पवारांनी ही नौटंकी बंद केली पाहिजे. उद्या तुम्ही एमआयडीसीसाठी जो बायडन यांना पत्र लिहाल. त्यामुळे एवढ्या लांबपर्यंत पत्र पाठवण्यापेक्षा घरातल्या घरी अजित दादांच्या उशाला पत्र ठेवलं असतं तर अजित दादांनी वाचलं असतं. पंतप्रधानांना तुम्ही पत्र पाठवले, मात्र तुम्ही यापूर्वी गावोगावी काही पत्र पेट्या लावल्या होत्या, त्यात आलेल्या पत्रापैकी किती प्रश्न सोडवले.

तसेच पुणे येथील कार्यक्रमात एमआयडीसीसाठी फलक झळकवण्यापेक्षा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे त्याच कार्यक्रमात होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेजारी ते बसले होते. मग त्यांच्या हातात एखादं निवेदन किंवा पत्र का दिले नाही? असा सवाल राम शिंदे यांनी विचारला आहे.

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल