राजकारण

Ramdas Athawale : शिंदे-फडणवीसांची जमली जोडी, अडीच वर्ष चालणार सत्तेची गाडी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

संजय देसाई | सांगली : राज्य सरकार चालणार नाही, असे विरोधक म्हणत असले तरी, आमचं राज्य सरकार फक्त अडीच वर्षं नाही तर पुढील दहा वर्षे चालणार, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी शिंदे आणि फडणवीस (Shinde-Fadnavis Government) यांची जमलेली आहे जोडी, अडीज वर्ष चालणार आहे सत्तेची गाडी, अशी कविताही केली. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी आठवले हे बोलत होते.

रामदास आठवले म्हणाले की, यापूर्वी महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही, असे आम्ही म्हणत होतो. आता विरोधक हे युती सरकार चालणार नाही, असे म्हणत आहेत. मात्र, युती सरकार फक्त अडीच वर्षं नाही तर पुढील दहा वर्षे टिकणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

जो पर्यंत नरेंद्र मोदी खंबीरपणे उभे आहेत, तोपर्यंत आम्हाला कोणतीही चिंता नाही, असे सांगून आठवले पुढे म्हणाले, शिंदे आणि फडणवीस यांची जमलेली आहे जोडी, अडीच वर्ष चालणार आहे सत्तेची गाडी', अशी कविता सुद्धा त्यांच्या शैलीतील कविताही सादर केली. साहित्यिक आणि कादंबरीकार डॉ. शंकरराव खरात यांच्या स्मारकासाठी 40 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी माहितीही केंद्रीय रामदास आठवले यांनी दिली.

शिवसेनेच्या बंडखोर 16 अमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तातडीने निर्णय द्यावा. यासाठी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळली असून 16 अमदारांवर पुढील सुनावणी होईपर्यंत कारवाई करण्यास मनाई केली आहे. पुढील सुनावणी ही सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर होणार आहे. सर्वोच्च न्यायलायाचा हा निर्णय शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला दिलासा देणारा निर्णय आहे. तर, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर ही एकनाथ शिंदे गटाचा विजय निश्चित होईल. लोकशाहीत बहुमताचा निर्णय हाच न्यायसंगत असतो त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांना जरूर न्याय मिळेल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil : 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार